प्रेम संबध असल्याची समाजात खोटी बदनामी, शेवटी “तिने” उचलला टोकाचा पाऊल,तिघां विरुद्ध गुन्हा दाखल
बुलडाणा – 20 मे, मिरर न्युज नेटवर्क
मुलीचे प्रेम संबंध आहेत अशी समाजात खोटी बदनामी करून तिला जीवाने मारण्याची धमकी दिली.तिचा छळ सुद्धा केल्याने पिडीतेने या जाचा ला कंटाळून विषारी द्रव्य घेऊन आत्महत्या केल्याने आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी तिघां विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.ही घटना मोताळा तालुक्यातील बोराखेडी पोलिस ठाणे अर्तंगत उघडकीस आली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,बेबीबाई राजू सोळंके रा.दाताळा ता.मलकापूर जि. बुलडाणा ह.मु.तालखेड ता.मोताळा यांनी आरोपी नातेवाईक विजू अशोक सोळंके,हिरामण सदाशिव पवार,प्रमीला हिरामण पवार सर्व रा.परडा फाटा ता.मोताळा यांच्या विरुद्ध बोराखेडी पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीत नमूद केले आहे की,आरोपींनी त्यांचा मुलगा विश्वजित याचे सोबत मृतक मुलगी लता राजू सोळंके (वय 21) हीचे प्रेमसंबध असल्याची समाजात खोटी बदनामी केली व तिला जिवाने मारण्याची धमकी दिली होती.त्यामुळे तिने आरोपींच्या जाचाला कंटाळून विषारी द्रव्य प्राशन करून आत्महत्या केली.या आरोपींनी मृतकास आत्महत्येस प्रवृत्त केले आहे.या प्रकरणी पोलिसांनी आरोपी विजू अशोक सोळंके,हिरामण सदाशिव पवार,प्रमीला हिरामण पवार सर्व रा.परडा फाटा ता.मोताळा यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला असून पुढील तपास बोराखेडी पोलीस करीत आहे.
पुरवठा विभागाच्या मुंबई येथील दक्षता पथकाची खामगाव जवळ "गॅस-कॅप्सूल" वर मोठी धाड,खामगाव परिसरातील गॅस माफियांचे धाबे दणाणले
बुलडाणा - 29 जुलै, मिरर न्युज नेटवर्क
मागील काळात संपूर्ण देशभर गॅस टंचाई जाणवत...