बुलडाणा जिल्हा पोलिस दलात प्रशासकीय फेरबदल, हेमंत ठाकरे यांची एलसीबीच्या प्रमुख पदी नियुक्ती,8 पोलीस निरीक्षकांच्या बदल्या

More articles

बुलडाणा जिल्हा पोलिस दलात प्रशासकीय फेरबदल, हेमंत ठाकरे यांची एलसीबीच्या प्रमुख पदी नियुक्ती,8 पोलीस निरीक्षकांच्या बदल्या

बुलडाणा – 29 जुलै, मिरर न्युज नेटवर्क

बुलडाणा जिल्हा पोलिस दलात प्रशासकीय कार्यक्षमता अधिक बळकट करण्याच्या उद्देशाने 8 पोलीस निरीक्षकांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांनी 28 जुलैच्या रात्री यासंदर्भातील आदेश जारी केले आहे.
या आदेशानुसार बुलडाणा जिल्ह्यातील विविध पोलीस ठाणे, स्थानिक गुन्हे शाखा, वाहतूक शाखा, पासपोर्ट शाखा व नियंत्रण कक्षातील अधिकाऱ्यांच्या नव्या नियुक्त्या करण्यात आल्या आहेत. बदली झालेल्या अधिकाऱ्यांनी तातडीने नवीन ठिकाणी कार्यभार स्वीकारण्याचे निर्देशही आदेशात देण्यात आले आहेत.
        पोनि. हेमंत ठाकरे यांची स्थानिक गुन्हे शाखेच्या प्रमुख पदी नियुक्ती करण्यात आली असून
पोनि. संग्राम पाटील यांची बुलडाणा शहर पोलीस ठाणेदार पदी,पोनि. गजानन कांबळे यांची सायबर पोलीस ठाणे,पोनि. श्रीकांत निचळ यांची तामगांव पोलीस ठाणे,पोनि. देविदास इंगोले यांची पासपोर्ट शाखा, बुलडाणा येथे,पोनि. सचिन बागुल जळगाव जामोद पोलीस ठाणे,पोनि. आशीष रोही यांची बुलडाणा ग्रामीण पोलीस ठाणे तर पोनि. रवी राठोड यांची आर्थिक गुन्हे शाखेत बदली करण्यात आली आहे.जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अधिक प्रभावी करण्यासाठी तसेच प्रशासकीय कामकाजात गतिमानता आणण्यासाठी हा फेरबदल करण्यात आल्याचे आदेशात नमूद करण्यात आले आहे. नव्याने नियुक्त झालेले अधिकारी लवकरच आपल्या पदाचा कार्यभार स्वीकारणार आहेत.

FM REDIO

spot_img

live Cricket Score

Latest

FM REDIO 2

पुरवठा विभागाच्या मुंबई येथील दक्षता पथकाची खामगाव जवळ "गॅस-कॅप्सूल" वर मोठी धाड,खामगाव परिसरातील गॅस माफियांचे धाबे दणाणले बुलडाणा - 29 जुलै, मिरर न्युज नेटवर्क मागील काळात संपूर्ण देशभर गॅस टंचाई जाणवत...
spot_img
error: Content is protected !!