ताडोबातील ‘मोना’चे ज्ञानगंगा अभयारण्यात आगमन,,,’धुरंधर’ला मिळणार जोडीदार,ज्ञानगंगेत वाघसंवर्धनाला नवी चालना

More articles

ताडोबातील ‘मोना’चे ज्ञानगंगा अभयारण्यात आगमन,,,’धुरंधर’ला मिळणार जोडीदार,ज्ञानगंगेत वाघसंवर्धनाला नवी चालना

बुलडाणा – 27 जुलै, मिरर न्युज नेटवर्क

गेल्या सात महिन्यांपासून बुलडाणा जिल्ह्यातील ज्ञानगंगा अभयारण्यात एकाकी वास्तव्य करणाऱ्या ‘धुरंधर’ या नर वाघाला अखेर जोडीदार मिळाला आहे. ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पातून ‘मोना’ नावाच्या वाघिणीला रविवारी २६ जुलैच्या उशिरा रात्री ज्ञानगंगा अभयारण्यात आणून खामगाव वनपरिक्षेत्रात सोडण्यात आले आहे. या दोन्ही वाघांच्या संभाव्य मिलनामुळे ज्ञानगंगा अभयारण्यात वाघांची संख्या वाढण्यास मदत होणार असल्याने वन्यजीव प्रेमींमध्ये आनंदाचे वातावरण आहे.

यावर्षीच्या सुरुवातीलाच, ३ जानेवारीच्या रात्री पेंच व्याघ्र प्रकल्पातून ‘धुरंधर’ या तरुण नर वाघाला ज्ञानगंगा अभयारण्यात आणण्यात आले होते. प्रारंभी त्याला सुमारे १५ दिवस संरक्षित तारकुंपणात ठेवण्यात आले. त्यानंतर तो स्वतः या तार कुंपणातून बाहेर निघाला आणि संपूर्ण अभयारण्याचा परिसर फिरून त्याने येथे आपला अधिवास क्षेत्र निश्चित केले.मात्र, वाघ संवर्धनाच्या दृष्टीने त्याला जोडीदाराची आवश्यकता होती. त्यानुसार वन विभागाने आवश्यक प्रक्रिया पूर्ण करून ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पातून सुमारे २४ महिन्यांची ‘मोना’ ही प्रौढ वाघीण निवडली. रविवारी मध्यरात्री तिला विशेष बंदोबस्तात ज्ञानगंगा अभयारण्यात आणून सुरक्षितरीत्या सोडण्यात आले.या स्थलांतराच्या वेळी अकोला वन्यजीव विभागाचे विभागीय वन अधिकारी (डीएफओ) यशवंत नागुलवार, सहाय्यक वनसंरक्षक चेतन राठोड, खामगावचे वनपरिक्षेत्र अधिकारी दीपेश लोखंडे, बुलडाण्याचे वनपरिक्षेत्र अधिकारी प्रकाश सावळे तसेच वन विभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
वन विभागाच्या या उपक्रमामुळे ज्ञानगंगा अभयारण्यातील वाघसंवर्धनाला नवी गती मिळणार असून, भविष्यात येथे वाघांची संख्या वाढण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

FM REDIO

spot_img

live Cricket Score

Latest

FM REDIO 2

पुरवठा विभागाच्या मुंबई येथील दक्षता पथकाची खामगाव जवळ "गॅस-कॅप्सूल" वर मोठी धाड,खामगाव परिसरातील गॅस माफियांचे धाबे दणाणले बुलडाणा - 29 जुलै, मिरर न्युज नेटवर्क मागील काळात संपूर्ण देशभर गॅस टंचाई जाणवत...
spot_img
error: Content is protected !!