चहा प्यायला ये म्हटलं माय,,मेहकर मध्ये एका चहाची किंमत 1 लाख 10 हजार,, कसं तर बातमी अवश्य वाचा

More articles

चहा प्यायला ये म्हटलं माय,,मेहकर मध्ये एका चहाची किंमत 1 लाख 10 हजार,, कसं तर बातमी अवश्य वाचा

मेहकर – 18 मे, मिरर न्युज नेटवर्क

बातमीची हेडिंग वाचून नक्कीच कोणालाही विश्वास बसणार नाही परंतु हे खरं आहे.बुलडाणा जिल्ह्यातील मेहकर मध्ये एका चहाची किंमत 1 लाख 10 हजार रुपये एवढी आहे.ते कसं तर चला आम्ही सविस्तर सांगतो,,
     एका शेतकऱ्याला चहा पिणे महागात पडले. हा चहा त्यांना तब्बल 1 लाख 10 हजार रुपयांचा पडला.कारण ते हॉटेलवर चहा पिण्यासाठी गेले असता, त्यांच्या उभ्या दूचाकीच्या डिक्कीतून ही रक्कम अज्ञात चोरट्याने लंपास केली.ही घटना जानेफळ रोडवरील हॉटेल तोरणा,मेहकर जि. बुलडाणा येथे 17 मे रोजी घडली.याप्रकरणी पोलिसांनी अज्ञात चोरट्या विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
       पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,रा.साब्रा ता. मेहकर येथील फिर्यादी शेतकरी उत्तम पुंजाजी दुगाणे वय 43 वर्ष हे आपल्या दुचाकीने साब्रा येथून एसबीआय कृषी शाखा मेहकर येथे गेले होते.खात्यावर जमा झालेल्या 1 लाख 15 हजार रुपयां पैकी 1 लाख 10 हजार रुपये त्यांनी बँक खात्यातून काढून प्लास्टिकच्या पिशवीत ठेवून ते निघाले होते. दरम्यान जानेफळ रोडवरील हॉटेल तोरणा समोर दुपारी अडीच वाजताच्या सुमारास त्यांच्या गावातील परमेश्वर ठाकरे यांच्याशी त्यांची भेट झाली.यावेळी त्यांनी हॉटेलवर चहा घेतला आणि परत दुचाकी जवळ आले असता त्यांनी दुचाकीची डिक्की तपासली तेव्हा डिक्कीतील रक्कम लंपास झाल्याचे दिसून आले. त्यामुळे उत्तम पुंजाजी दुगाणे यांनी मेहकर पोलीस स्टेशनला याबाबत तक्रार दिल्यावरून अज्ञात आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पुढील तपास मेहकर पोलीस करीत आहेत.

FM REDIO

spot_img

live Cricket Score

Latest

FM REDIO 2

पुरवठा विभागाच्या मुंबई येथील दक्षता पथकाची खामगाव जवळ "गॅस-कॅप्सूल" वर मोठी धाड,खामगाव परिसरातील गॅस माफियांचे धाबे दणाणले बुलडाणा - 29 जुलै, मिरर न्युज नेटवर्क मागील काळात संपूर्ण देशभर गॅस टंचाई जाणवत...
spot_img
error: Content is protected !!