BREAKING!!!”शिकारी खुद हुआ शिकार” वनविभाग मदतीला धावले पण,,,सवना रोडवरील घटना

More articles

“शिकारी खुद हुआ शिकार”
वनविभाग मदतीला धावले पण,,,सवना रोडवरील घटना

बुलडाणा – 22 फेब्रुवारी, मिरर न्युज नेटवर्क

सवना रस्त्या लगतच्या गोठ्यात जखमी अवस्थेत आढळलेल्या एका बिबट्याच्या बछड्याला वन विभागाच्या पथकाने उपचारासाठी बुलडाणा येथील पशुवैद्यकीय रुग्णालयात नेले,परंतु उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला.ही घटना आज 22 फेब्रुवारी रोजी दुपारी 1 वाजेच्या सुमारास घडली आहे.
       चिखली तालुक्यातील सवना रोडवरील गट क्रमांक 47 मधील शंकर दलसिंग राजपूत यांच्या शेतातील गोठ्यात एक बिबट्या जखमी अवस्थेत असल्याची माहिती आज सकाळी 11 वाजेच्या सुमारास बुलडाणा वन विभागाला मिळाली. ही माहिती मिळताच आरएफओ अभिजीत ठाकरे, वनपाल मोहसीन खान,वनरक्षक जी.आर.शिंदे तसेच रेस्क्यू पथकातील संदीप मडावी,अमोल चौहान,पवन वाघ,अक्षय बोरसे,व इतर वन कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. त्या ठिकाणी शेतातील गोठ्यात जवळपास 6 महिन्याचा बिबट्याचा बछडा गंभीर जखमी अवस्थेत दिसून आला. पथकाने बिबट्याला उचलून बुलढाणा येथील पशुवैद्यकीय रुग्णालयात आणले.पशुवैद्यकीय रुग्णालयातील डॉक्टरांनी त्याला मृत्यू घोषित केले. सदर बिबट्याच्या बछड्यावर शासकीय लाकूड आगारात पशु वैद्यकीय अधिकारी डॉ.पाचरने,डॉ. मंगेश गाढे,डॉ सावळे यांनी शवविच्छेदन केले व त्याच ठिकाणी एसीएफ वैभव काकडे, एसीएफ प्रशिक्षणार्थी वर्षा कोळेकर, बुलडाणा तहसीलदार विठ्ठल कुमरे,आरएफओ अभिजित ठाकरे यांच्या उपस्थितीत मृतदेह जाळून नष्ट करण्यात आले आहे.

बछड्यावर इतर प्राण्यांनी केला हल्ला????

शेतातील गोठ्यात मिळून आलेला बिबट्याचा बछडा गंभीर जखमी होता. बिबट्याचा बछडा आपल्या आई पासून दुरावल्याने तो एकटाच फिरत होता अशात लांडगा किंवा कुत्र्याने त्याच्यावर हल्ला चढविला व या हल्ल्यात तो गंभीर जखमी झाला व यामुळे त्याचा मृत्यू झाला असेल असा अंदाज वन विभागाकडून व्यक्त करण्यात येत आहे.

FM REDIO

spot_img

live Cricket Score

Latest

FM REDIO 2

अनाधिकृत स्कूल व्हॅनच्या धडकेत दुसऱ्या तरुणाचाही उपचारा दरम्यान मृत्यू,दारुड्या चालकाच्या हलगर्जीपणा व आरटीओ विभागाच्या दुर्लक्षितपणामुळे 2 मित्रांनी गमावला जीव बुलडाणा - 25 फेब्रुवारी, मिरर न्युज नेटवर्क शाळा सुटल्यावर विद्यार्थ्यांना अनधिकृतरित्य आपल्या...
spot_img
error: Content is protected !!