“गई भैंस गड्डे में”,,,, कॉलमच्या खड्ड्यात पडलेल्या वगारला सुखरूप काढले बाहेर

More articles

“गई भैंस गड्डे में”,,,, कॉलमच्या खड्ड्यात पडलेल्या वगारला सुखरूप काढले बाहेर

बुलडाणा – 6 फेब्रुवारी, मिरर न्युज नेटवर्क

बुलडाणा शहरातील खालिद बिन वलीद नगर मध्ये घराच्या बांधकामासाठी खोदलेल्या कॉलमच्या खड्ड्यात एक वगार पडल्याची घटना आज 6 फेब्रुवारीला दुपारी उघडकीस आली आहे.या वगारला बांधकाम मजुरांनी सुखरूप बाहेर काढल्यानंतर या वगारने एकच धूम ठोकली.


       बुलडाणा शहराचा विस्तार झपाट्याने होत आहे.नवनवीन वस्त्या तयार होत असून मोठ्या प्रमाणात नवीन घरांचे बांधकाम देखील सुरू आहे.आरटीओ ऑफिसच्या पाठीमागील भागात खालीद बिन वलीद नगर मध्ये मस्जिद जवळ सुरू असलेल्या बांधकामाच्या एका कॉलमच्या खड्ड्यात एक वगार आज गुरुवारी सकाळी 10 वाजेच्या सुमारास पडली होती. दुपारी 1 वाजेच्या सुमारास बांधकामासाठी ठेकेदार पोहोचला असता ही बाब त्याच्या लक्षात आल्यानंतर अगोदर दोन-तीन लोकांनी वगारला बाहेर काढण्याचा प्रयत्न केला परंतु ते यशस्वी झाले नाही, म्हणून त्यांनी जवळ सुरू असलेल्या बांधकामावरील देऊळघाट येथील कामगारांना ही बाब सांगत मदत मागितली असता देऊळघाटचे तरुण धावून आले व सगळ्यांनी मिळून दोरीच्या सहाय्याने खड्ड्यात पडलेली वगारला सुखरूप बाहेर काढले.ही वगार खड्ड्याच्या बाहेर येताच तिने एकच धूम ठोकली.

FM REDIO

spot_img

live Cricket Score

Latest

FM REDIO 2

पुरवठा विभागाच्या मुंबई येथील दक्षता पथकाची खामगाव जवळ "गॅस-कॅप्सूल" वर मोठी धाड,खामगाव परिसरातील गॅस माफियांचे धाबे दणाणले बुलडाणा - 29 जुलै, मिरर न्युज नेटवर्क मागील काळात संपूर्ण देशभर गॅस टंचाई जाणवत...
spot_img
error: Content is protected !!