बुलडाणा शहरातील जनतेने आयुष्यमान भारत योजनेसाठी नोंदणी करावी!गणेश पांडे,मुख्यधिकारी
बुलडाणा – 5 फेब्रुवारी, मिरर न्युज नेटवर्क
गोरगरीब जनतेला आरोग्य सुविधा उपलब्ध व्हावे या हेतूने सन 2018 पासून आयुष्मान भारत योजना केंद्र सरकारने अंमलात आणली असून यात 5 लाखापर्यंतचा वार्षिक विमा दिला जात आहे.या योजनेचा लाभ घेण्यासाठी प्रत्येकाकडे आयुष्यमान भारत कार्ड असणे गरजेचे असून बुलडाणा शहरातील गरजुवंत नागरिकांनी आयुष्यमान भारत कार्ड अवश्य काढावे असे आवाहन बुलडाणा नगरपालिकेचे मुख्याधिकारी गणेश पांडे यांनी केले आहे.
बुलडाणा जिल्ह्यात आयुष्यमान भारताचे कार्ड कमी प्रमाणात काढलेले आहे त्यामुळे बुलडाणा जिल्ह्यातील जनतेला याचा लाभ कमी मिळणार,अशी खंत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली.या विषयावर बुलडाणा जिल्हाधिकारी डॉ.किरण पाटील यांनी अधिकाऱ्यांची महत्त्वपूर्ण बैठक घेऊन जिल्ह्यात जास्तीत जास्त आयुष्यमान भारत कार्ड तयार करून घेण्याचे निर्देश दिले.त्या अनुषंगाने बुलडाणा नगरपालिकेचे मुख्य अधिकारी गणेश पांडे यांनी नगरपालिकेत एक बैठकीचे आयोजन केले त्यात शहरातील अंगणवाडी सेविका, मदतनीस,आशा वर्कर तसेच नगरपालिका शाळेतील शिक्षक व इतर कर्मचाऱ्यांना बोलविण्यात आले. ॲप द्वारे आयुष्यमान भारत कार्ड कसा तयार करावा याबाबत आयुष्यमान भारतचे जिल्हा समन्वयक डॉ.विवेक सावके यांनी उपस्थितांना माहिती दिली.बुलडाणा शहरात आयुष्यमान भारत कार्ड तयार करून घेण्यासाठी विविध स्तरावरून प्रयत्न केले जाणार जेणेकरून गोरगरीब जनतेला याचा लाभ मिळेल,अशी माहिती मुख्याधिकारी गणेश पांडे यांनी दिली आहे.बैठकीत आयुष्यमान भारतचे जिल्हा समन्वयक डॉ.विवेक सावके,आरोग्य मित्र पियुष सावळे,नितीन गवई, स्वप्नील इंगळे,डॉ.प्रिया भोसले,डॉ.योगेश सावळे, महेंद्र सोभागे आदी प्रामुख्याने उपस्थित होते.


