लाडकी बहिणी योजना,, निकषात न बसणाऱ्यांना लाभ दिला कसा??दोषींवर कारवाई करा अन्यथा उच्च न्यायालयात जाणार,जितेंद्र जैन यांचं सरकारला इशारा

More articles

लाडकी बहिणी योजना,,
निकषात न बसणाऱ्यांना लाभ दिला कसा??दोषींवर कारवाई करा अन्यथा उच्च न्यायालयात जाणार,जितेंद्र जैन यांचं सरकारला इशारा

बुलडाणा – 3 मार्च, मिरर न्युज नेटवर्क

राज्यात विधानसभा निवडणुकीपूर्वी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना अमलात आणली असून त्या माध्यमाने महिलांना आमिष देऊन एका प्रकारे मतदान घेण्यात आले.आता निवडणूक संपली असून निकषात ना बसणाऱ्या महिलांना लाभ मिळणार नाही.निकषात न बसणाऱ्यांना लाभ दिल्याने दोषीवर अपहाराचा गुन्हा दाखल करण्याची मागणी बुलडाणा येथील सामाजिक कार्यकर्ते जितेंद्र एन.जैन यांनी केली असून जर कारवाई झाली नाही तर उच्च न्यायालयात धाव घेणार अशी माहिती जैन यांनी “बुलडाणा मिरर”शी बोलतांना दिली आहे.
        मुख्यमंत्र्यांना दिलेल्या निवेदनात नमूद करण्यात आले आहे की ‘लाडकी बहीण योजना’ अंतर्गत लाभार्थ्यांची निवड करताना काही ठिकाणी निकषांची योग्य तपासणी, कागदपत्रांची पडताळणी व गृहचौकशी न करता राजकीय फायद्यासाठी हा निर्णय घेण्यात आला होता. यामुळे सरकारी निधीचा अपव्यय झाला असून, योजनेंतर्गत लाभ घेणाऱ्या पात्र महिलावर अन्याय झाला आहे.महिला व बाल विकास विभागाच्या इतर योजनांमध्ये लाभार्थ्यांची गृहचौकशी व कागदपत्रांची तपासणी काटेकोरपणे केली जाते.मात्र,या योजनेत असे झाले नाही.त्यामुळे महिला व बाल विकास विभागाचे प्रधान सचिव, आयुक्त, उपायुक्त व संबंधित जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी यांच्यासह जबाबदार असलेल्या सर्व अधिकाऱ्यांची सखोल चौकशी करून दोषींवर भारतीय दंड संहितेच्या अधिनियमां नुसार अपहाराचा गुन्हा दाखल करावा.अशी मागणी जितेंद्र जैन यांनी केली आहे. जर संबंधितावर कारवाई झाली नाही तर नागपूर उच्च न्यायालयात याचिका दाखल करणार, असा इशारा देखील त्यांनी दिला आहे.

FM REDIO

spot_img

live Cricket Score

Latest

FM REDIO 2

पुरवठा विभागाच्या मुंबई येथील दक्षता पथकाची खामगाव जवळ "गॅस-कॅप्सूल" वर मोठी धाड,खामगाव परिसरातील गॅस माफियांचे धाबे दणाणले बुलडाणा - 29 जुलै, मिरर न्युज नेटवर्क मागील काळात संपूर्ण देशभर गॅस टंचाई जाणवत...
spot_img
error: Content is protected !!