“फ्युरी”ने घेतला शेतकऱ्याचा जीव???तिघांवर जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू,, भयंकर विषबाधा,, जिल्ह्यात कुठे घडला हा प्रकार?? सविस्तर वाचा या बातमीत

More articles

“फ्युरी”ने घेतला शेतकऱ्याचा जीव???तिघांवर जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू,, भयंकर विषबाधा,, जिल्ह्यात कुठे घडला हा प्रकार?? सविस्तर वाचा या बातमीत

बुलडाणा – 18 जुलै, मिरर न्युज नेटवर्क

मकाच्या कंसात कीड लागू नये म्हणून अनेक शेतकरी त्यात “फ्युरी” हे औषध टाकत असतात. आज गुरुवारी दुपारी धामणगाव बढे येथील आपल्या शेतात मकाच्या कंसात फ्युरी टाकत असताना विषबाधा होऊन एका वृद्ध शेतकऱ्याचा मृत्यू झाल्याचा आरोप मृतकाच्या नातेवाईकांनी केला असून 3 जणांवर जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहे.
बुलडाणा जिल्ह्यातील मोताळा तालुका अंतर्गतच्या ग्राम धामणगाव बढे येथील दामोदर नारायण जाधव वय 60 वर्ष व त्यांच्या परिवारातील इतर सदस्य आपल्या शेतात आज 18 जुलै रोजी सकाळी गेले होते. यावेळी ते शेतातील मकाच्या कंसात कीड होऊ नये म्हणून फ्युरी टाकत असताना काही जणांना मळमळ व उलट्या होऊ लागले.तात्काळ नातेवाईकांनी त्यांना धामणगाव बढे येथील प्राथमिक आरोग्य केंद्र येथे नेले असता त्यांना बुलडाणा येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात रेफर करण्यात आले. दामोदर नारायण जाधव यांना जिल्हा सामान्य रुग्णालयातील डॉक्टरांनी मृत्यू घोषित केले आहे तर मोहन देवानंद जाधव वय 12 वर्ष, बेबीबाई शिवाजी जाधव वय 57 वर्ष आणि सुभद्राबाई लक्ष्मण जाधव वय 60 वर्ष यांच्यावर सध्या उपचार सुरू आहे.

FM REDIO

spot_img

live Cricket Score

Latest

FM REDIO 2

पुरवठा विभागाच्या मुंबई येथील दक्षता पथकाची खामगाव जवळ "गॅस-कॅप्सूल" वर मोठी धाड,खामगाव परिसरातील गॅस माफियांचे धाबे दणाणले बुलडाणा - 29 जुलै, मिरर न्युज नेटवर्क मागील काळात संपूर्ण देशभर गॅस टंचाई जाणवत...
spot_img
error: Content is protected !!