जंगलाला लागून असलेल्या गिरडा परिसरात मागील काही महिन्यापासून मोठ्या प्रमाणात बिबट्यांनी धुमाकूळ घालत पाळीव जनावरांना ठार केले आहे.त्यामुळे गावकऱ्यांमध्ये दहशतीचे वातावरण होते. मागणीनुसार वन विभागाने गावाजवळ पिंजरे लावले असता यात 2 बिबट अडकल्याची घटना 27 जूनच्या रात्रीच्या सुमारास उघडकीस आली आहे.पिंजऱ्यात कैद या दोन्ही बिबट्यांना अभयारण्यात सोडण्यात येणार असल्याची माहिती बुलडाणा आरएफओ अभिजीत ठाकरे यांनी दिली आहे.
बुलडाणा तालुक्यातील गिरडा हे गाव अजिंठा पर्वत रांगेवर वसलेले आहे. गावाला लागूनच घनदाट जंगल असल्यामुळे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात हिंस्त्र प्राण्यांचे अधिवास आहे. अनेक वेळा बिबट, अस्वल, तडस सारखे वन्यप्राणी गावात देखील दाखल होतात.मागील काही महिन्यापासून परिसरात बिबट्या सतत दिसत असल्याने परिसरातील शेतकऱ्यांत भीतीचे वातावरण होते. अशात एका शेतकऱ्याची गिर जातीची गायिला बिबट्यांनी ठार केले होते. या घटनेनंतर बुलडाणा वन विभागाने गिरडा गावालगतच एक पिंजरा लावला होता. काल रात्री एक मादी बिबट या पिंजऱ्यात अडकली व त्याच्या अवतीभवती 2 पिल्ले फिरत असल्याचे लक्षात आल्यानंतर तात्काळ वन विभागाने दुसरा पिंजरा लावला त्यात ही एक बिबट्याचा बछडा अडकला.या ठिकाणी अजून बिबट असल्याने आता तिसरा पिंजरा सुद्धा लावण्यात आला आहे. एकाच वेळी 2 पिंजऱ्यात 2 बिबट्या अडकल्याने गावकऱ्यांनी समाधान व्यक्त केला आहे.डीएफओ सरोज गवस यांच्या आदेशाने बुलडाणा आरएफओ अभिजीत ठाकरे यांच्या नेतृत्वात वनपाल स्वप्नील वानखेडे,वन रक्षक प्रदीप मुंडे,बाळासाहेब घुले,रेस्क्यू टीमचे संदीप मडावी,अमोल चौहान,दीपक गायकवाड, प्रवीण सोनुने,वन मजूर दीपक सोनुने,रेवन तायडे तसेच राजू गायकवाड व गावकऱ्यांच्या मदतीने फिजिकल रेस्क्यू करून काल रात्री भरपावसात दोन्ही बिबट्यांना बुलडाणा येथील उपवन संरक्षण कार्यालयात आणले. आता वरिष्ठांच्या आदेशानुसार बिबट्यांना अभयारण्यात सोडण्यात येणार असल्याची माहिती आरएफओ अभिजीत ठाकरे यांनी 28 जूनला दिली आहे.
पुरवठा विभागाच्या मुंबई येथील दक्षता पथकाची खामगाव जवळ "गॅस-कॅप्सूल" वर मोठी धाड,खामगाव परिसरातील गॅस माफियांचे धाबे दणाणले
बुलडाणा - 29 जुलै, मिरर न्युज नेटवर्क
मागील काळात संपूर्ण देशभर गॅस टंचाई जाणवत...