ब्रेKING!!!3 विद्यार्थिनींचा लैंगिक छळ करणाऱ्या आरोपी शिक्षकाला पोलिसांनी केली अटक,एका वर्षापासून शाळेतच सुरू आहे घृणास्पद कृत्य

More articles

3 विद्यार्थिनींचा लैंगिक छळ करणाऱ्या आरोपी शिक्षकाला पोलिसांनी केली अटक,एका वर्षापासून शाळेतच सुरू आहे घृणास्पद कृत्य

बुलडाणा – 23 ऑगस्ट, मिरर न्युज नेटवर्क

बदलापुरातील अत्याचारानंतर अकोल्यातील प्रकरण ताजे असतानाच बुलडाणा जिल्ह्यातील एका जिल्हा परिषदेच्या शाळेत शिक्षकाकडूनच चौथ्या वर्गात शिकणाऱ्या 3 विद्यार्थिनींचा विनयभंग करण्यात आल्याची धक्कादायक घटना आज 23 ऑगस्टला सकाळी उघडकीस आली आहे. पोलिसांनी प्रकरणाची गांभीर्याने दखल घेत तात्काळ आरोपी शिक्षकाला गजाआड केली आहे.
 या बाबत प्राप्त माहिती अशी की, सिंदखेडराजा तालुक्यातील वर्दळी गावातील जिल्हा परिषदेच्या शाळेत शिकणाऱ्या चौथ्या वर्गातील 3 विद्यार्थिनींना नराधम शिक्षकाच्या गैर वर्तणुकीला सामोरे जावं लागलं आहे.या घटनेने बुलडाणा जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे.बुलडाणा जिल्ह्यातील किनगाव राजा पोलिसांनी पीडित बालिकेच्या तक्रारीवर आरोपी शिक्षक खुशाल उगले विरोधात विनयभंग, पोस्को व ॲट्रॉसिटी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.या घटनेनंतर संतप्त गावकरी किनगाव राजा पोलिसात पोहोचले व त्यांनी आरोपी शिक्षकाला तातडीने कठोर शासन करण्याची मागणी केली.किनगाव राजा पोलिसाचे एक पथक आरोपी शिक्षक खुशाल उगलेला शोधण्यासाठी रवाना करण्यात आले आणि आरोपी शिक्षकाला अटक करण्यात आल्याची माहिती किनगाव राजा ठाणेदार विनोद नरवाडे यांनी दिली आहे.

FM REDIO

spot_img

live Cricket Score

Latest

FM REDIO 2

पुरवठा विभागाच्या मुंबई येथील दक्षता पथकाची खामगाव जवळ "गॅस-कॅप्सूल" वर मोठी धाड,खामगाव परिसरातील गॅस माफियांचे धाबे दणाणले बुलडाणा - 29 जुलै, मिरर न्युज नेटवर्क मागील काळात संपूर्ण देशभर गॅस टंचाई जाणवत...
spot_img
error: Content is protected !!