बुलडाणा जिल्ह्यात पुन्हा गारपिटीने शेतकऱ्याचे पीक जमीनदोस्त,खा.जाधव व आ.गायकवाड यांनी बांधावर जाऊन केली पाहणी
बुलडाणा – 12 एप्रिल
हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजानुसार 10 एप्रिलला पासून भाग बदलत बुलडाणा जिल्ह्यात जोरदार वाऱ्या सह अवकाळी पाऊस व गारपीट होत आहे.
आज 12 एप्रिलला सायंकाळी 4 वाजेच्या सुमारास बुलडाणा जिल्ह्याच्या मोताळा तालुक्यात वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस आणि तुफान गारपीट झालीये, त्यामुळे शेतकऱ्यांच्या शेतातील पिकांचे मोठ नुकसान झाल आहे. अनेक ठिकाणी झाडे कोलमडून पडली आहेत.या आस्मानी संकटामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे.याची माहिती मिळताच खा.प्रतापराव जाधव आणि आ संजय गायकवाड यांनी बोराखेडी शिवारातील बांधावर जाऊन नुकसानीची पाहणी केली व तत्काळ पंचनामे करण्याचे निर्देश दिले आहेत.

