पुरवठा विभागाच्या मुंबई येथील दक्षता पथकाची खामगाव जवळ “गॅस-कॅप्सूल” वर मोठी धाड,खामगाव परिसरातील गॅस माफियांचे धाबे दणाणले
बुलडाणा – 29 जुलै, मिरर न्युज नेटवर्क
मागील काळात संपूर्ण देशभर गॅस टंचाई जाणवत होती. आता तरी गॅस पुरवठा रुळावर आला असतांना बुलडाणा जिल्ह्यातील खामगाव जवळ मुंबईच्या पुरवठा विभागाच्या दक्षता पथकाने मोठी कारवाई करत अवैधरित्य गॅस टँकर मधून गॅस काढणाऱ्या रॅकेटला रंगेहात पकडले आहे. या कारवाईमुळे खामगाव परिसरातील गॅस माफिया मध्ये एकाच खळबळ उडाली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, गॅस प्लांट वरून टँकरद्वारे गॅसची वाहतूक इतर ठिकाणी केली जाते, परंतु काही गॅस माफिया संबंधित गॅस कंपनीच्या खदाळ अधिकाऱ्यांशी हात मिळवणी करून रस्त्यात निर्धारित ठिकाणी टँकर मधून गॅस काढून घेतात आणि हीच गॅस वेगवेगळ्या कंपन्यांच्या सिलेंडर मध्ये भरून याची काळ्याबाजारात विक्री करतात.या बाबतची गुप्त माहिती पुरवठा विभागाच्या मुंबई येथील दक्षता पथकाचे प्रमुख गणेश बेल्लाळे यांना मिळाली होती. त्यानुसार त्यांनी सापळा रचला आणि त्यांच्या पथकाने आज 29 जुलै रोजी रात्री खामगाव ते बाळापूर राष्ट्रीय महामार्गावर सुदर्शन धाब्याजवळ च्या एका पंपावर धाड टाकून इंडियन गॅसच्या टँकर मधून अवैधरित्या गॅस काढतांना रंगेहात पकडले आहे.या प्रकरणी पुढील कारवाई दक्षता पथकाकडून सुरू असून या काळ्या कामातील आरोपींची नावे लवकरच समोर येणार.

