मूर्तिजापूर जवळ अपघातात बुलडाणा येथील 2 तरुणांचा मृत्यू

More articles

मूर्तिजापूर जवळ अपघातात बुलडाणा येथील 2 तरुणांचा मृत्यू

बुलडाणा – 7 फेब्रुवारी, मिरर न्युज नेटवर्क

नागपूरहून लोखंडी पाईप घेऊन येणाऱ्या आयशर वाहनाचा रात्री अमरावती – अकोला राष्ट्रीय महामार्गावर मूर्तीजापुर तालुक्यातील कुरम गावाजवळ अपघात झाला असून कॅबिनमध्ये अडकून बुलडाणा येथील चालक व क्लीनर या दोन तरुणांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. त्यामुळे शहरात शोकळा पसरली आहे.

        याबाबत प्राप्त माहिती अशी की बुलडाणा येथील जोहर नगर भागात राहणारे अनीसोद्दीन रफीयोद्दीन काझी वय 40 वर्ष आणि रेहान नाजिम पठाण वय 22 वर्षे दोघेही नागपूर येथून आपल्या आयशर वाहनात लोखंडी पाईप घेऊन छत्रपती संभाजी नगरच्या दिशेने निघाले होते. त्यादरम्यान रात्री 12 ते 1 वाजेच्या दरम्यान कुरम,ता.मूर्तिजापुर, जि.अकोला येथे त्यांच्या वाहनाचा अपघात झाला. आयशर वाहन रस्त्याच्या कडेला एका खड्ड्यात जाऊन धडकल्याने वाहणातील पूर्ण लोखंडी पाईप केबिनवर धडकले आणि कॅबिन मधील दोन्ही जण दबल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला आहे. अपघात कसा घडला हे अद्याप पर्यंत समजू शकले नाही. घटनेची माहिती मिळताच नातेवाईकांनी घटनास्थळाकडे धाव घेतली.आज शनिवारी दुपारी वाहनातील लोखंडी पाईप हटविण्याचे काम सुरू होते.

FM REDIO

spot_img

live Cricket Score

Latest

FM REDIO 2

अनाधिकृत स्कूल व्हॅनच्या धडकेत दुसऱ्या तरुणाचाही उपचारा दरम्यान मृत्यू,दारुड्या चालकाच्या हलगर्जीपणा व आरटीओ विभागाच्या दुर्लक्षितपणामुळे 2 मित्रांनी गमावला जीव बुलडाणा - 25 फेब्रुवारी, मिरर न्युज नेटवर्क शाळा सुटल्यावर विद्यार्थ्यांना अनधिकृतरित्य आपल्या...
spot_img
error: Content is protected !!