बुलडाणा येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयच्या बांधकामावर परप्रांतीय मजुराने केलं मोठं कांड,5 वर्षीय अल्पवयीन मुलीसोबत नको ते कृत्यु व केले अपहरण, बुलडाणा ग्रामीण पोलिसांनी मलकापूर रेल्वे स्टेशन वरून मुलीला सुखरूप घेतले ताब्यात, आरोपी मजुराकडे आधार कार्डच नाही,,,बांधकाम करणारी कंत्राट कंपनी “सॅम इंडिया”ची मोठी चूक आली समोर

More articles

बुलडाणा येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयच्या बांधकामावर परप्रांतीय मजुराने केलं मोठं कांड,5 वर्षीय अल्पवयीन मुलीसोबत नको ते कृत्यु व केले अपहरण,
बुलडाणा ग्रामीण पोलिसांनी मलकापूर रेल्वे स्टेशन वरून मुलीला सुखरूप घेतले ताब्यात, आरोपी मजुराकडे आधार कार्डच नाही,,,बांधकाम करणारी कंत्राट कंपनी “सॅम इंडिया”ची मोठी चूक आली समोर

बुलडाणा – 1 फेब्रुवारी, मिरर न्युज नेटवर्क

बुलडाणा तालुक्यातील हतेडी शिवारात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे बांधकाम सुरू असून या कामावर असलेल्या एका 25 वर्षीय आरोपी मजुराने 5 वर्षीय अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केले,त्यात रक्तस्त्राव होत असल्याने आरोपीने मुलीला रुग्णालयात ना नेता तिचे अपहरण करून थेट मलकापूर रेल्वे स्टेशन गाठले परंतु बुलडाणा पोलिसांनी शिताफीने पीडित मुलीला ताब्यात घेत आरोपी विरुद्ध पोक्सो,अपहरण या कलमान्वये गुन्हा दाखल करत अटक केली असून पीसीआर संपल्यावर आरोपीची न्यायालयीन कोठडीत जिल्हा कारागृहात रवानगी करण्यात आली आहे.
         बुलडाणा जिल्ह्यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व्हावे अशी मागणी सुरू होती, यासाठी जिल्ह्यातील अनेक नेत्यांनी हातभार लावला आणि शासनाने ही मागणी पूर्ण केली. बुलडाणा तालुक्यातील हतेडी शिवारात या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे बांधकाम सुरू असून “सॅम इंडिया” या कंपनीने बांधकामाचे कंत्राट घेतलेले आहे. मागील काही महिन्यापासून प्रत्यक्षात बांधकाम सुरू झाले आहे. यासाठी बांधकाम करणारी “सॅम इंडिया” या कंपनीने मोठ्या प्रमाणात परप्रांतीय मजूर आणले असून त्याच ठिकाणी त्यांना राहण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. 28 जानेवारी रोजी दुपारी 5 वर्षीय मुलगी एकटी असतांना आरोपी संतोष ब्रिजपाल भोईया,वय 25 वर्ष,रा.चरकील,जि. पलामु,झारखंड याने मुलीला झोपडीत नेले आणि शारीरिक संबंध प्रस्थापित केले. त्यामुळे मुलीच्या गुप्तांगातून मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव सुरू झाला. अशात आरोपीने त्या चिरमुडीचे अपहरण केले व तिला घेऊन थेट मलकापूर रेल्वे स्टेशन गाठले.संध्याकाळी तिचे आई-वडील कामावरून परतले असता त्यांना मुलगी दिसली नाही. परिसरात शोध घेतला तरीही त्याचा पत्ता लागला नाही. त्यामुळे याची माहिती तात्काळ बुलडाणा ग्रामीण पोलिसांना देण्यात आली.ठाणेदार गजानन कांबळे यांनी सदर माहिती वायरलेस द्वारे संपूर्ण जिल्ह्याला देत सतर्क केले.तसेच ग्रामीण पोलिसांच्या पथकाने घटनास्थळी धाव घेत माहिती घेतल्यानंतर कळाले की सदर मुलगी आरोपी संतोष भोईया याच्यासोबत जाताना दिसली होती. जिल्ह्यातील सर्व बस स्थानक आणि रेल्वे स्टेशनवर आरोपी व मुलीचा शोध सुरू करण्यात आला शेवटी रात्री मलकापूर शहर पोलिसांनी तेथील रेल्वे स्टेशनवर आरोपी व मुलीला शोधून काढले. बुलढाणा ग्रामीण पोलिसांनी धाव घेत आरोपी व मुलीला ताब्यात घेऊन बुलडाणा आणले.

आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय हतेडी येथे सुरू असलेल्या कामावर परप्रांतीय मजूर काम करीत असून त्यातील संतोष भुईया याने 5 वर्षीय मुलीवर शारीरिक अत्याचार केल्याप्रकरणी पीडित मुलीच्या वडिलांनी दिलेल्या तक्रारीनुसार आरोपी विरुद्ध पोक्सो व अपहरण चा गुन्हा दाखल करून त्याला अटक केली होती.बुलडाणा कोर्टात आरोपीला हजर केल्याने त्याला दोन दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली होती ती संपल्याने आरोपीची रवानगी न्यायालयीन कोठडीत जिल्हा कारागृहात करण्यात आली आहे.

पीडित मुलीवर अकोला येथे उपचार सुरू

जबरी अतिप्रसंग केल्यामुळे पीडित मुलीचा मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव सुरू होता. पोलिसांनी जेव्हा तिला आरोपीच्या ताब्यातून आणले तेव्हा पण तीच परिस्थिती होती. पोलिसांनी पिढीतेला रुग्णालयात उपचारासाठी नेले परंतु रक्त सराव थांबत नसल्याने पुढील उपचारासाठी अकोला येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारासाठी दाखल करण्यात आल्याची माहिती बुलडाणा ग्रामीणचे ठाणेदार गजानन कांबळे यांनी दिली आहे.

परप्रांतीय आरोपीकडे “आधार कार्ड” सुद्धा नाही

शासकीय बांधकामासाठी आणलेल्या मजुरांचा विमा काढने नियमानुसार आवश्यक आहे त्यासाठी कामगारांचे कागदपत्र त्यांच्याकडे असले पाहिजे परंतु हतेडी येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या बांधकामावरील एका मजुराने अल्पवयीन मुलीवर शारीरिक अत्याचार केल्यानंतर जेव्हा पोलिसांनी त्याला अटक केली असता एक गंभीर बाब समोर आली आहे,या आरोपीने अद्याप पर्यंत आपला आधार कार्ड सुद्धा बनवलेला नाही त्यामुळे महाविद्यालयाचा बांधकाम करणारी “सॅम इंडिया” ही कंपनी किती तत्पर आहे हे या भयंकर घटनेत उघड झाले आहे.

FM REDIO

spot_img

live Cricket Score

Latest

FM REDIO 2

पुरवठा विभागाच्या मुंबई येथील दक्षता पथकाची खामगाव जवळ "गॅस-कॅप्सूल" वर मोठी धाड,खामगाव परिसरातील गॅस माफियांचे धाबे दणाणले बुलडाणा - 29 जुलै, मिरर न्युज नेटवर्क मागील काळात संपूर्ण देशभर गॅस टंचाई जाणवत...
spot_img
error: Content is protected !!