खंडणी,सरकारी कामात अडथळा आणि विनयभंगाच्या आरोपातून पत्रकाराची निर्दोष मुक्तता

More articles

खंडणी,सरकारी कामात अडथळा आणि विनयभंगाच्या आरोपातून पत्रकाराची निर्दोष मुक्तता


बुलडाणा – 23 जानेवारी, मिरर न्युज नेटवर्क

खंडणीची मागणी,सरकारी कामात अडथळा आणणे आणि महिलेचा विनयभंग करणे अश्या गंभीर स्वरूपाच्या आरोपातून पत्रकार अजहर शेख याची बुलडाणा जिल्हा सत्रन्यायालयाने सबळ पुराव्याअभावी 22 जानेवारी रोजी निर्दोष मुक्तता केली आहे.
​         प्रकरणाची हकीकत अश्या प्रकारे आहे की,प्रा. आरोग्य केंद्र एकलारा, ता.चिखली येथे कार्यरत तक्रारदार महिला वैद्यकीय अधिकारी यांनी दि.30 सप्टेंबर 2023 रोजी चिखली पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीत नमूद केले होते की,प्रा.आरोग्य केंद्र एकलारा येथे माझी ओपीडी ड्यूटी सुरू असतांना आरोपी अजहर शेख याने माझ्या सरकारी कामात अडथळा आणला आणि शिवीगाळ करत झटापट केली.अश्या तक्रारीवर आरोपी पत्रकार अजहर शेख विरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.या तक्रारीनंतर पोलिसांनी आरोपीला अटक करून दोषारोपपत्र दाखल केले होते.​आरोपीच्या वतीने ॲड.राज मोहम्मद शेख यांनी प्रभावी युक्तिवाद केला.त्यांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले की,तक्रारदाराने केलेले आरोप हे केवळ आकसापोटी आणि पूर्वग्रहातून करण्यात आले आहेत.​घटनेच्या ठिकाणी उपस्थित असलेल्या साक्षीदारांच्या जबानीत कमालीची विसंगती आहे.​सरकारी कामात अडथळा निर्माण झाल्याचा कोणताही ठोस पुरावा किंवा सीसीटीव्ही चित्रीकरण पोलीस सादर करू शकले नाहीत. विनयभंग आणि खंडणीच्या आरोपांमध्ये कोणतेही तथ्य नसून, आरोपीला खोट्या प्रकरणात अडकवण्यात आले आहे.​न्यायालयाने ​दोन्ही बाजूंचा युक्तिवाद आणि सादर केलेले पुरावे विचारात घेऊन,ॲड. राज मोहम्मद शेख यांचा युक्तिवाद मान्य केला. सरकारी पक्ष आरोपी अजहर शेख याच्यावर लावलेले आरोप सिद्ध करण्यात अपयशी ठरल्याचे ताशेरे ओढत न्यायालयाने पत्रकार अजहर शेख याची सर्व आरोपांतून मुक्तता केली आहे.

FM REDIO

spot_img

live Cricket Score

Latest

FM REDIO 2

बुलडाणा येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयच्या बांधकामावर परप्रांतीय मजुराने केलं मोठं कांड,5 वर्षीय अल्पवयीन मुलीसोबत नको ते कृत्यु व केले अपहरण, बुलडाणा ग्रामीण पोलिसांनी मलकापूर रेल्वे स्टेशन वरून मुलीला सुखरूप घेतले...
spot_img
error: Content is protected !!