मजुरीचे पैसे आणण्यासाठी घरून निघाले परंतु रस्त्यातच झाला घात, पिंपरखेड फाट्याजवळ अपघातात एक जण ठार

More articles

मजुरीचे पैसे आणण्यासाठी घरून निघाले परंतु रस्त्यातच झाला घात, पिंपरखेड फाट्याजवळ अपघातात एक जण ठार

बुलडाणा – 18 जानेवारी, मिरर न्युज नेटवर्क

बुलडाणा ते खामगाव महामार्गावरील पिंपरखेड फाट्याजवळ दुचाकी आणि एर्टिगा कारच्या अपघातात एक जण ठार तर एक जखमी झाल्याची घटना आज 18 जानेवारीला सायंकाळी 7 वाजेच्या सुमारास घडली आहे.
याबाबत प्राप्त माहिती अशी की बुलडाणा येथील मिलिंद नगर भागात राहणारे वसंत घेवंदे वय 48 आणि विशाल पंजाबराव खंडारे वय 40 वर्षे हे बांधकाम मजूर असून मजुरीचे पैसे आणण्यासाठी ते वरवंडच्या दिशेने जात असताना समोरून येणाऱ्या ईरटीगा कारने त्यांच्या दुचाकीला पिंपरखेड फाट्याजवळ जोरदार धडक दिली. यात दोघेही गंभीर जखमी झाले,त्यांना तात्काळ बुलडाणा येथील जिल्हा रुग्णालयात दाखल केले असता विशाल खंडारे याला डॉक्टरने मृत घोषित केले. तर वसंता घेवंदे यांच्यावर उपचार सुरू आहे. माहिती मिळताच बुलडाणा ग्रामीण पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला तसेच अपघातग्रस्त वाहने बाजूला केली. यावेळी जिल्हा सामान्य रुग्णालयात मिलिंद नगर भागातील लोकांनी एकच गर्दी केलेली आहे.

FM REDIO

spot_img

live Cricket Score

Latest

FM REDIO 2

बुलडाणा येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयच्या बांधकामावर परप्रांतीय मजुराने केलं मोठं कांड,5 वर्षीय अल्पवयीन मुलीसोबत नको ते कृत्यु व केले अपहरण, बुलडाणा ग्रामीण पोलिसांनी मलकापूर रेल्वे स्टेशन वरून मुलीला सुखरूप घेतले...
spot_img
error: Content is protected !!