अखेर वनविभागाने मध्यरात्री घडवले शावक व आईचे पुनर्मिलन,मकाच्या शेतात आढळला होतं बिबट्याचा शावक

More articles

अखेर वनविभागाने मध्यरात्री घडवले शावक व आईचे पुनर्मिलन,मकाच्या शेतात आढळला होतं बिबट्याचा शावक

बुलडाणा – 11 मार्च, मिरर न्युज नेटवर्क

बुलडाणा जिल्ह्यातील जवळा बाजार जवळ असलेल्या एका मकाच्या शेतात बिबट्याचा एक ते दिड महिन्याचा शावक आढळून आला होतं. त्यामुळे परिसरातील शेतकऱ्यांच्या मनात भीतीचे वातावरण पसरले होते. आपल्या आई पासून दुरावलेल्या या पिल्लूला आई पुन्हा मिळावी यासाठी वन विभागाने प्रयत्न केले आणि अर्ध्या रात्री दोघाचे पुनर्मिलन ट्रॅप कॅमेऱ्यात कैद झाले आहे.

             नांदुरा तालुक्यातील जवळा बाजार येथील शेतकरी सुनील उखर्डा ढोकने यांची गावा जवळ शेती आहे. सुनील ढोकने 9 मार्चला सकाळी 10 वाजेच्या सुमारास शेतात गेले असता त्यांना शेतातील मका पिकात बिबट्याचे एक ते दिड महिन्याचा शावक दिसून आला होते. मादी बिबट जवळच असेल अशी शंका होती. शेतकरी सुनील ढोकने यांनी तात्काळ मोताळा वनविभागाला याची माहिती दिली. आरएफओ किशोर पडोळ यांच्या मार्गदर्शनात वनपाल ए.एन. सपकाळ, वनरक्षक एल.डी. राठोड, चालक वैभव फुंड व काही वन मजूर घटनास्थळी पोहोचले व बिबट्याच्या शावकाला ताब्यात घेऊन परिसरात शोध घेतला. परंतु मादी बिबट्या मिळून आली नाही. या पिल्लूला मोताळा येथे आणून त्याची पशुवैद्यकीय अधिकाऱ्याकडून तपासणी केली असता तो सुदृढ असल्याचे सांगण्यात आले. बुलडाणा डीएफओ सरोज गवस, एसीएफ अश्विनी आपेट यांच्या निर्देशानुसार आरएफओ किशोर पडोळ आपल्या पथकासह पिल्लुला घेऊन आई व पिल्लुचे मिलन व्हावे यासाठी जवळा बाजार येथील शेतकरी सुनील ढोकणे यांच्या शेतात सायंकाळी पोहोचले. शावकाला प्लास्टिकच्या कॅरेट मध्ये सुरक्षित ठेवण्यात आले तसेच आजूबाजू ट्रॅप कॅमेरे लावण्यात आले. अधिकारी व कर्मचारी घटनास्थळा पासून काही लांब निघून गेले. अशात मध्यरात्री शावकाचा आवाज ऐकून त्याची आई कॅरेट जवळ पोहोचली व आपल्या शावकाला तोंडात धरून निघून गेली. हे क्षण पाहून वनविभाग आनंदित झाल्याची प्रतिक्रिया मोताळा आरएफओ किशोर पडोळ यांनी आज 11 मार्चला सायंकाळी दिली आहे.

FM REDIO

spot_img

live Cricket Score

Latest

FM REDIO 2

पुरवठा विभागाच्या मुंबई येथील दक्षता पथकाची खामगाव जवळ "गॅस-कॅप्सूल" वर मोठी धाड,खामगाव परिसरातील गॅस माफियांचे धाबे दणाणले बुलडाणा - 29 जुलै, मिरर न्युज नेटवर्क मागील काळात संपूर्ण देशभर गॅस टंचाई जाणवत...
spot_img
error: Content is protected !!