BREAKING!!!समृद्धी महामार्गावर भाविकांच्या क्रुझरचा भीषण अपघात,दोघांचा मृत्यू तर 10 जखमी,जखमीवर जालना येथे उपचार सुरू

More articles

BREAKING!!!समृद्धी महामार्गावर भाविकांच्या क्रुझरचा भीषण अपघात,दोघांचा मृत्यू तर 10 जखमी,जखमीवर जालना येथे उपचार सुरू

बुलडाणा – 8 मार्च,मिरर न्युज नेटवर्क

यवतमाळहून शिर्डीला जाणाऱ्या भाविकांच्या क्रुझरला बुलडाणा जिल्ह्यातील सिंदखेडराजा जवळ माळसावरगाव शिवारात मुंबई कॉरिडॉरवर भीषण अपघात झाल्याची घटना आज 8 मार्चला सकाळी 8 वाजेच्या सुमारास घडली.या घटनेत दोघांचा मृत्यू झाला असून 10 ते 12 भाविक जखमी झालेत. या अपघातात जखमी झालेल्या 9 जणांवर जालना येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू असून त्यापैकी तिघांची प्रकृती चिंताजनक आहे.

      आज सकाळी यवतमाळहुन शिर्डीकडे देव दर्शनाला जाण्यासाठी 12 ते 15 भाविक क्रुझर गाडीने निघाले होते. या दरम्यान सिंदखेडराजा हद्दीत समृद्धी महामार्गावर क्रुझर गाडीचे टायर फुटल्याने हा अपघात झाला. या घटनेत दोघांचा जागीच मृत्यू झाला असून त्यात एक महिलांनी एक पुरुषाचा समावेश आहे.

अन् क्रुझरवर क्रेटा धडकली

शिर्डीच्या दिशेने जाणारी क्रुझरचा टायर फुटल्याने चालकाचा वाहनावरील नियंत्रण सुटला आणि गाडी पलटी झाली अशात मागून क्रेटा कार येत होती ती या क्रुझरवर धडकली मात्र सुदैवाने क्रेटा कार मधील सर्व प्रवासी सुरक्षित असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

FM REDIO

spot_img

live Cricket Score

Latest

FM REDIO 2

पुरवठा विभागाच्या मुंबई येथील दक्षता पथकाची खामगाव जवळ "गॅस-कॅप्सूल" वर मोठी धाड,खामगाव परिसरातील गॅस माफियांचे धाबे दणाणले बुलडाणा - 29 जुलै, मिरर न्युज नेटवर्क मागील काळात संपूर्ण देशभर गॅस टंचाई जाणवत...
spot_img
error: Content is protected !!