अवैध गर्भलिंगनिदान व गर्भपात प्रकरणात बुलडाणा जिल्ह्यातील 4 महिला डॉक्टरांचे पाय खोलात, भोकरदनच्या तपासात जालना एलसीबीने केले आरोपी

More articles

अवैध गर्भलिंगनिदान व गर्भपात प्रकरणात बुलडाणा जिल्ह्यातील 4 महिला डॉक्टरांचे पाय खोलात, भोकरदनच्या तपासात जालना एलसीबीने केले आरोपी

बुलडाणा – 19 जानेवारी, मिरर न्युज नेटवर्क

अवैध गर्भलिंगनिदान, गर्भपात प्रकरणात जालना एलसीबीने केलेल्या तपासात आता जालना, छत्रपती संभाजीनगर आणि बुलडाण्यातील 9 डॉक्टरांसह 12 जणांना नव्याने आरोपी करण्यात आले आहे.यात बुलडाणा जिल्ह्यातील 5 डॉक्टरांचा समावेश असून त्यापैकी एका डॉक्टरला जालना एलसीबीच्या पथकाने बुलडाणा येथून अटक केली आहे.विशेष बाब म्हणजे या कुकृत्य मध्ये बुलडाणा जिल्ह्यातील 4 महिला डॉक्टर सहभागी आहे.जालना एलसीबीने अटक केलेल्या आरोपी नाना सहाणे आणि बुलडाण्यातील डॉ.विजय प्रभाकर सोळंकी यांना न्यायालयाने 22 जानेवारीपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.
          या बाबत प्राप्त माहिती अशी की,बुलडाणा जिल्ह्याच्या सीमेला लागून असलेले जालना जिल्ह्यातील भोकरदन येथे जुलै 2024 मध्ये अवैध गर्भलिंग निदान केंद्राचा पर्दाफाश झाला होता. त्या प्रकरणात पोलिसांनी 15 जणांवर गुन्हे दाखल केले होते. त्यातील 14 जणांना आजपर्यंत अटक केली आहे.विशेषतः आरोपी नाना सहाणेचा जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळल्यानंतर तो 12 जानेवारी रोजी पोलिसांना शरण आला. त्याच्याकडे चौकशी केल्यानंतर बुलडाणा येथील अवैध गर्भपात करणाऱ्या डॉ.विजय सोळंकी याचे नाव समोर आले होते.त्या दोघांकडे पोलिसांनी अधिक चौकशी केल्यानंतर तब्बल 8 डॉक्टरांसह इतर कर्मचारी अशी 12 जणांची नावे समोर आली आहे.या मध्ये बुलडाणा जिल्ह्यातील 4 महिला डॉक्टर असून अटक आरोपी डॉ. विजय सोळंकी यांची पत्नी मोहिनी सोळंकी (सोळंकी हॉस्पिटल,बुलडाणा),
प्रमीला सोळंकी (रविदीप हॉस्पिटल,बुलडाणा), डॉ.संगीता देशमुख, देऊळघाट ता.जि.बुलडाणा आणि डॉ. सुलक्षणा अग्रवाल (अग्रवाल हॉस्पिटल, चिखली जि. बुलडाणा) यांचं समावेश आहे.

जिजाऊंच्या जिल्ह्यात हे काय सुरू आहे????

राष्ट्रमाता माँ साहेब जिजाऊ यांच्या जिल्ह्यात हादरून सोडणारा वास्तव भोकरदनच्या घटनेवरून समोर आलंय.जिल्ह्यातील 4 महिला डॉक्टर आपल्या रुग्णालयात अवैध गर्भपात करीत आहे? पण जिल्ह्यात अशे प्रकार मोठ्या प्रमाणात सुरू असल्याची माहिती “बुलडाणा मिरर” ला मिळाली आहे.एका अवैध गर्भपातसाठी 50 ते 80 हजार रुपये घेतले जात आहे.

FM REDIO

spot_img

live Cricket Score

Latest

FM REDIO 2

पुरवठा विभागाच्या मुंबई येथील दक्षता पथकाची खामगाव जवळ "गॅस-कॅप्सूल" वर मोठी धाड,खामगाव परिसरातील गॅस माफियांचे धाबे दणाणले बुलडाणा - 29 जुलै, मिरर न्युज नेटवर्क मागील काळात संपूर्ण देशभर गॅस टंचाई जाणवत...
spot_img
error: Content is protected !!