बुलडाणा जिल्ह्यातील आणखी एक अधिकारी मंत्रालयीन सेवेत, आदिवासी विकास मंत्र्यांच्या खासगी सचिवपदी ललीतकुमार वऱ्हाडे

More articles

बुलडाणा जिल्ह्यातील आणखी एक अधिकारी मंत्रालयीन सेवेत, आदिवासी विकास मंत्र्यांच्या खासगी सचिवपदी ललीतकुमार वऱ्हाडे

बुलडाणा – 9 जानेवारी, मिरर न्युज नेटवर्क

राज्याचे आदिवासी विकास मंत्री प्रा.अशोक उईके यांच्या खासगी सचिवपदी उपजिल्हाधिकारी ललीतकुमार वऱ्हाडे यांची नियुक्ती झाली आहे. वऱ्हाडे यांच्या नियुक्तीने बुलडाणा जिल्ह्यातील आणखी एका अधिकाऱ्यास मुंबई येथे मंत्रालयीन सेवेत काम करण्याची संधी मिळाली आहे.
         उपजिल्हाधिकारी ललीतकुमार वऱ्हाडे मूळचे बुलडाणा जिल्ह्यातील मेहकर तालुक्यातील देऊळगाव माळी गावचे रहिवासी आहेत. त्यांनी वणी, मोर्शी, चांदुर रेल्वे, कारंजा लाड येथे उपविभागीय अधिकारी तर बुलडाणा, यवतमाळ येथे निवासी उपजिल्हाधिकारी म्हणून उत्कृष्ट कार्य केले आहे. सध्या ते नांदेड येथे रोजगार हमी योजना उपजिल्हाधिकारी म्हणून कार्यरत आहेत. मूळगावी दहावीपर्यंत शिक्षण झाल्यानंतर त्यांनी बुलडाणा येथून बारावी आणि डीएडचे शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षक म्हणून रुजू झाले. अध्यापनाचे कार्य करीत असतांना त्यांनी स्पर्धा परीक्षेची तयारी सुरु ठेवली. त्याद्वारे त्यांची उपजिल्हाधिकारी पदी निवड झाली.

समाजशील अन खिलाडूवृत्तीचा अधिकारी

उपजिल्हाधिकारी ललीतकुमार वऱ्हाडे हे समाजशील अन खिलाडूवृत्तीचे अधिकारी म्हणून ओळखले जातात. सामाजिक कार्यात त्यांचा नेहमीच हिरिरीने सहभाग असतो. यासोबतच ते सर्वोत्तम खेळाडू आहेत. क्रिकेट, रनिंग, सायकलिंग, खो-खो, हॉलीबॉल खेळात त्यांनी प्राविण्य मिळवले आहे. आतापर्यंत 50 पेक्षा अधिक मॅरेथॉनमध्ये त्यांनी सहभाग नोंदवला आहे. तसेच जगातील अतिशय खडतर समजली जाणारी दक्षिण आफ्रिकेतील कॉम्रेड मॅरेथॉन त्यांनी वेळेत पूर्ण केलेली आहे. सुदृढ आरोग्यासाठी मैदानी खेळ खेळणे आवश्यक असल्याचे त्यांचे म्हणणे आहे.

बुलडाणा जिल्ह्याला मंत्रालयीन सेवेचा वारसा

बुलडाणा जिल्ह्याला मंत्रालयीन सेवेचा वारसा आहे. जिल्ह्यातील अधिकाऱ्यांनी मुंबई मंत्रालयात उत्तम कार्य केले आहे. विद्याधर महाले सध्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे खासगी सचिव आहेत. मेहकरचे आमदार सिद्धार्थ खरात यांनी मंत्रालयात विविध विभागात काम केले. त्यांना मंत्रालयीन प्रशासकीय कामाचा दांडगा अनुभव आहे. माजी उपजिल्हाधिकारी सुनील शेळके तत्कालीन कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांचे विशेष कार्य अधिकारी होते. आता ललीतकुमार वऱ्हाडे यांची आदिवासी विकास मंत्र्यांचे खासगी सचिव म्हणून नियुक्ती झाल्याने मंत्रालयीन कामकाजाचा वारसा पुढे चालू राहणार आहे.

FM REDIO

spot_img

live Cricket Score

Latest

FM REDIO 2

पुरवठा विभागाच्या मुंबई येथील दक्षता पथकाची खामगाव जवळ "गॅस-कॅप्सूल" वर मोठी धाड,खामगाव परिसरातील गॅस माफियांचे धाबे दणाणले बुलडाणा - 29 जुलै, मिरर न्युज नेटवर्क मागील काळात संपूर्ण देशभर गॅस टंचाई जाणवत...
spot_img
error: Content is protected !!