घरफोड्यांनंतर नागरिक झाले सतर्क; “आपली सुरक्षा आपल्या हाती”चा निर्धार,,रात्री राहणार जागता पहारा,,,खालीद बिन वलीद नगरमध्ये मोहल्ला सुरक्षा समितीची स्थापना

More articles

घरफोड्यांनंतर नागरिक झाले सतर्क; “आपली सुरक्षा आपल्या हाती”चा निर्धार,,रात्री राहणार जागता पहारा,,,खालीद बिन वलीद नगरमध्ये मोहल्ला सुरक्षा समितीची स्थापना

बुलडाणा – 20 जुलै, मिरर न्युज नेटवर्क

बुलडाणा शहरातील खालीद बिन वलीद नगर परिसरात नुकत्याच झालेल्या घरफोड्यांच्या घटनांनंतर परिसरातील नागरिकांनी एकत्र येत सुरक्षेसाठी महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. “आपली सुरक्षा आपल्या हाती” हा संदेश देत नागरिकांनी मोहल्ला सुरक्षा समितीची स्थापना केली असून, दररोज रात्री स्वयंस्फूर्तीने जागता पहारा देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.


          काही दिवसांपूर्वी अज्ञात चोरट्यांनी एकाच रात्री खालीद बिन वलीद नगर परिसरातील 3 घरे फोडून दागिने व रोख रक्कम लंपास केली होती. या घटनेमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी 19 जुलै रोजी परिसरातील नागरिकांनी स्वयंस्फूर्तीने एका बैठकीचे आयोजन केले होते.या बैठकीत सर्वानुमते मोहल्ला सुरक्षा समिती स्थापन करण्यात आली असून त्यात 40 जणांचा सहभाग आहे. दररोज रात्री 1 ते 5 वाजेपर्यंत मोहल्ला समितीतील 4 नागरिक संपूर्ण परिसरात गस्त घालणार असून संशयास्पद हालचालींवर लक्ष ठेवणार आहे.


           यावेळी नागरिकांना काही महत्त्वाच्या सूचना देण्यात आल्या. रात्री घरासमोरील लाईट सुरू ठेवणे, बाहेर गावी जाताना शेजाऱ्यांना किंवा विश्वासू व्यक्तींना माहिती देणे, घरावर सीसीटीव्ही कॅमेरे बसविणे तसेच संशयास्पद व्यक्ती किंवा हालचाली आढळल्यास तात्काळ पोलिसांना याची माहिती देण्याचे आवाहन करण्यात आले आहे.या बैठकीला परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी नागरिकांनी एकजुटीने पुढाकार घेत परिसर सुरक्षित ठेवण्याचा निर्धार व्यक्त केला आहे.

Previous article
घरफोड्यांनंतर नागरिक झाले सतर्क; “आपली सुरक्षा आपल्या हाती”चा निर्धार रात्री राहणार जागता पहारा खालीद बिन वलीद नगरमध्ये मोहल्ला समितीची स्थापना बुलडाणा – 20 जुलै, मिरर न्युज नेटवर्क बुलडाणा शहरातील खालीद बिन वलीद नगर परिसरात नुकत्याच झालेल्या घरफोड्यांच्या घटनांनंतर परिसरातील नागरिकांनी एकत्र येत सुरक्षेसाठी महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. “आपली सुरक्षा आपल्या हाती” हा संदेश देत नागरिकांनी मोहल्ला सुरक्षा समितीची स्थापना केली असून, दररोज रात्री स्वयंस्फूर्तीने जागता पहारा देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. काही दिवसांपूर्वी अज्ञात चोरट्यांनी एकाच रात्री खालीद बिन वलीद नगर परिसरातील 3 घरे फोडून दागिने व रोख रक्कम लंपास केली होती. या घटनेमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी 19 जुलै रोजी परिसरातील नागरिकांनी स्वयंस्फूर्तीने एका बैठकीचे आयोजन केले होते.या बैठकीत सर्वानुमते मोहल्ला सुरक्षा समिती स्थापन करण्यात आली असून त्यात 40 जणांचा सहभाग आहे. दररोज रात्री 1 ते 5 वाजेपर्यंत मोहल्ला समितीतील 4 नागरिक संपूर्ण परिसरात गस्त घालणार असून संशयास्पद हालचालींवर लक्ष ठेवणार आहे. यावेळी नागरिकांना काही महत्त्वाच्या सूचना देण्यात आल्या. रात्री घरासमोरील लाईट सुरू ठेवणे, बाहेर गावी जाताना शेजाऱ्यांना किंवा विश्वासू व्यक्तींना माहिती देणे, घरावर सीसीटीव्ही कॅमेरे बसविणे तसेच संशयास्पद व्यक्ती किंवा हालचाली आढळल्यास तात्काळ पोलिसांना याची माहिती देण्याचे आवाहन करण्यात आले आहे. या बैठकीला परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी नागरिकांनी एकजुटीने पुढाकार घेत परिसर सुरक्षित ठेवण्याचा निर्धार व्यक्त केला आहे.
Next article

FM REDIO

spot_img

live Cricket Score

Latest

FM REDIO 2

पुरवठा विभागाच्या मुंबई येथील दक्षता पथकाची खामगाव जवळ "गॅस-कॅप्सूल" वर मोठी धाड,खामगाव परिसरातील गॅस माफियांचे धाबे दणाणले बुलडाणा - 29 जुलै, मिरर न्युज नेटवर्क मागील काळात संपूर्ण देशभर गॅस टंचाई जाणवत...
spot_img
error: Content is protected !!