बुलडाण्यात बिबट्याने गायीचे वासरू उचलून नेले; खालीद बिन वलीद नगर परिसरात भीतीचे वातावरण

More articles

बुलडाण्यात बिबट्याने गायीचे वासरू उचलून नेले; खालीद बिन वलीद नगर परिसरात भीतीचे वातावरण

बुलडाणा – 6 मार्च, मिरर न्युज नेटवर्क

बुलडाणा शहरालगतच्या जंगल परिसरात बिबट्यांची हालचाल वाढत असल्याचे पुन्हा एकदा समोर आले आहे. अन्नाच्या शोधात बिबटे आता नागरी वस्तीकडे वळत असल्याची भीती व्यक्त केली जात आहे. शहरातील खालीद बिन वलीद नगर येथे गुरुवारी 5 मार्चला रात्री बिबट्याने गायीचे वासरू उचलून जंगलाच्या दिशेने नेल्याची घटना घडली. या घटनेमुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

            आरटीओ कार्यायच्या मागे असलेलं खालीद बिन वलीद नगर हा परिसर अजिंठा पर्वतरांगेच्या काठावर वसलेला आहे.येथील रहिवासी सय्यद तौसिफ यांच्याकडे गिर प्रजातीची गाय असून काही दिवसांपूर्वीच तिने वासराला जन्म दिला होता. 5 मार्च रोजी रात्री सुमारे 10 वाजण्याच्या सुमारास गाय आणि वासरू वाड्यात बांधलेले असताना बिबट्याने भिंत ओलांडून वाड्यात प्रवेश केला आणि वासराला उचलून नेले.घटनेची जाणीव होताच गायीचे मालक सय्यद तौसिफ यांनी आरडाओरडा करत शोध घेण्याचा प्रयत्न केला. मात्र तोपर्यंत बिबट्या वासराला घेऊन जंगलाच्या दिशेने निघून गेला होता.याघटनेची माहिती मिळताच बुलडाणा वन विभागाचे वनपाल प्रदीप मुंढे व वनरक्षक झोटे यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत पाहणी केली. परिसरात बिबट्याच्या हालचालींबाबत सतर्क राहण्याचे आवाहन वन विभागाने नागरिकांना केले आहे. या आधी सुद्धा बुलडाणा शहरातील मिर्झा नगर, म्हाडा कॉलनी,करहाडे ले आऊट,क्रीडा संकुल परिसरात बिबट्याचा वावर दिसून आला आहे. काही महिन्यांपूर्वी बिबट्याने कुत्र्यांना सुद्धा लक्ष केले होते.नागरी वस्तीत घडलेल्या या घटनेमुळे परिसराती नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले असून वन विभागाने तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी स्थानिकांकडून होत आहे.

FM REDIO

spot_img

live Cricket Score

Latest

FM REDIO 2

पुरवठा विभागाच्या मुंबई येथील दक्षता पथकाची खामगाव जवळ "गॅस-कॅप्सूल" वर मोठी धाड,खामगाव परिसरातील गॅस माफियांचे धाबे दणाणले बुलडाणा - 29 जुलै, मिरर न्युज नेटवर्क मागील काळात संपूर्ण देशभर गॅस टंचाई जाणवत...
spot_img
error: Content is protected !!