भ्रष्टाचाऱ्यांची पाठ राखण म्हणून बुलडाणा बीडिओच्या केबिनमध्ये रात्रीपर्यंत बैठा आंदोलन निलंबित असताना ग्रामविकास अधिकाऱ्याने काढले 42 लाख, देऊळघाट ग्रामपंचायत मध्ये भ्रष्टाचाराचा आरोप

More articles

भ्रष्टाचाऱ्यांची पाठ राखण म्हणून बुलडाणा बीडिओच्या केबिनमध्ये रात्रीपर्यंत बैठा आंदोलन निलंबित असताना ग्रामविकास अधिकाऱ्याने काढले 42 लाख, देऊळघाट ग्रामपंचायत मध्ये भ्रष्टाचाराचा आरोप

बुलडाणा – 2 फेब्रुवारी, मिरर न्युज नेटवर्क

तालुक्यातील देऊळघाट ग्रामपंचायत मध्ये 15 वित्त आयोगाच्या निधीत मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झालेला आहे.तत्कालीन ग्रामविकास अधिकारी हे शासकीय सुट्टीवर असतांना आणि निलंबित असताना त्यांनी शासकीय निधी काढल्याचा गंभीर आरोप सिद्ध झालेला असून ग्रामविकास अधिकारी आणि सरपंचावर गुन्हा दाखल करण्यात यावा,या मागणीसाठी देऊळघाट येथील ग्रामस्थ बुलडाणा पंचायत समितीच्या गट विकास अधिकारी यांच्या दालनात दुपारपासून बैठा आंदोलन करीत आहे.
         नेहमी चर्चेत असणारी देऊळघाट ग्रामपंचायत मधील धक्कादायक भ्रष्टाचार उघड झाला आहे. तत्कालीन ग्रामविकास अधिकारी राजरत्न जाधव हे शासकीय सुट्टीवर असताना त्यांनी 52 लाख तसेच निलंबित असताना 45 लाख रुपयांचा निधी शासकीय खात्यातून काढल्याची तक्रार माजी सरपंच आरिफ खान, माजी तंटामुक्त अध्यक्ष जुनैद खान, माजी सरपंच गजनफरउल्ला खान, माजी उपसभापती मुश्ताक अहमद व इतरांनी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे केली होती. या गंभीर तक्रारीची दखल घेत प्रकरणाची चौकशी करण्यात आली असता त्यात तथ्य आढळल्याने तत्कालीन ग्रामविकास अधिकारी तसेच सरपंच यांच्यावर कारवाई करण्याचे आदेश 8 जानेवारीला देण्यात आले.परंतु बुलडाणा पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी डॉ.अमिता पवार हे टोलवाटोलवी करीत असून आज देखील त्यांनी याकडे दुर्लक्ष केल्याने तक्रार कर्त्यांनी दुपार पासून त्यांच्या केबिनमध्ये बैठा आंदोलन सुरू केलेला आहे.रात्री 9 वाजेपर्यंत या आंदोलनाची दखल कोणत्याही वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घेतली नाही तसेच भ्रष्टाचार करणाऱ्यांना प्रशासन पाठीशी घालत असल्याचा आरोप यावेळी आंदोलनकर्त्यांनी केला आहे.

FM REDIO

spot_img

live Cricket Score

Latest

FM REDIO 2

पुरवठा विभागाच्या मुंबई येथील दक्षता पथकाची खामगाव जवळ "गॅस-कॅप्सूल" वर मोठी धाड,खामगाव परिसरातील गॅस माफियांचे धाबे दणाणले बुलडाणा - 29 जुलै, मिरर न्युज नेटवर्क मागील काळात संपूर्ण देशभर गॅस टंचाई जाणवत...
spot_img
error: Content is protected !!