ब्रेKing!!!अतिवृष्टी पीडित शेतकरी पेट्रोलची कॅन घेऊन पोहोचला आ.डॉ. संजय कुटे यांच्या घरावर,शेतकऱ्या विरुद्ध गुन्हा दाखल

More articles

अतिवृष्टी पीडित शेतकरी पेट्रोलची कॅन घेऊन पोहोचला आ.डॉ. संजय कुटे यांच्या घरावर,शेतकऱ्या विरुद्ध गुन्हा दाखल

बुलडाणा – 14 जून, मिरर न्युज नेटवर्क

बुलडाणा जिल्ह्याचे माजी पालकमंत्री व जळगांव जामोदचे विद्यमान भाजपा आ.डॉ.संजय कुटे यांच्या घरावर काल 13 जूनच्या रात्री एक शेतकरी ज्वलनशील पदार्थाची कॅन घेऊन जळगांव जामोद येथील घरावर पोहोचला होता.2022 मध्ये जळगांव जा.येथे अतिवृष्टी झाली होती यात शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले होते.शासनाने पीडितांना कोट्यावधीचा मोबदला दिला होता परंतु या अनुदानात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला होता.खरे अतिवृष्टी पीडित या अनुदानापासून वंचित राहिले होते,,हे विशेष. सदर शेतकरी आ.कुटे यांच्या घरासमोर पोहोचल्या नंतर गोंधळ उडाला होता.पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत शेतकऱ्याला ताब्यात घेत त्याच्या विरुद्ध आत्महत्येचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला असून आज 14 जून रोजी आरोपीला न्यायालय समोर हजर करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.पीडित शेतकरीचे नांव विशाल मुरुड असून तो संग्रामपूर तालुक्यातील बावनबीर येथील रहिवासी आहे.स्वतः ला जाळून घेण्यासाठी की आमदारांचा बंगला जाळण्यासाठी तो गेलं होतं??याचा खुलासा अद्याप तरी होऊ शकला नाही.

FM REDIO

spot_img

live Cricket Score

Latest

FM REDIO 2

पुरवठा विभागाच्या मुंबई येथील दक्षता पथकाची खामगाव जवळ "गॅस-कॅप्सूल" वर मोठी धाड,खामगाव परिसरातील गॅस माफियांचे धाबे दणाणले बुलडाणा - 29 जुलै, मिरर न्युज नेटवर्क मागील काळात संपूर्ण देशभर गॅस टंचाई जाणवत...
spot_img
error: Content is protected !!