मुरूम माफिया बेलगाम,,तांदुळवाडी शिवारातून मुरुमाचे अवैध उत्खनन,2 ट्रॅक्टर केले जप्त

More articles

मुरूम माफिया बेलगाम,,तांदुळवाडी शिवारातून मुरुमाचे अवैध उत्खनन,2 ट्रॅक्टर केले जप्त

बुलडाणा – 6 जून, मिरर न्युज नेटवर्क

बुलडाणा तालुक्यातील नांद्राकोळी,कोलवड, तांदुळवाडी, या बुलडाणा शहराला लागून असलेल्या भागात शासकीय व खाजगी जमिनीतून अवैधपणे मुरुमाचे उत्खनन सुरू आहे.काही राजकीय पुढाऱ्यांचा वरदहस्त असल्याने याकडे महसूल विभागाचे कर्मचारी दुर्लक्ष करीत असल्याचं आरोप सामान्य जनतेकडून होत असते.तालुक्यात मुरूम माफिया बेलगाम असताना गुरुवारी बुलडाणा तहसीलदार यांनी पथक पाठवून तांदुळवाडी शिवारात शासकीय जमिनीतून अवैधपणे मुरुमाचे उत्खनन करून वाहतूक करणारे 2 ट्रॅक्टर जप्त केले आहे.या कारवाईमुळे तालुक्यातील मुरूम माफिया मध्ये खळबळ उडाली आहे.
          या बाबत प्राप्त माहिती अशी की देऊळघाट महसुली मंडळातील तांदुळवाडी शिवारात शासकीय जमीन असलेलं पराडा आहे.या ठिकाणाहून अनेक मुरूम माफिया रात्रंदिवस या शासकीय जमिनीतून जेसीबी लावून मुरुमाचे अवैध उत्खनन करीत आहे.या मुळे आतापर्यंत हजारों ब्रास मुरूम चोरून या माफियांनी लाखोंचा महसूल चोरी केला आहे.बुलडाणा तहसीलदार विठ्ठल कुमरे यांना गुरुवारी गुप्त माहिती मिळाली की तांदुळवाडी शिवारात शासकीय जमिनीतून मुरुमाचे उत्खनन सुरू आहे.माहिती मिळताच त्यांनी दुपारी एक पथक रवाना केले तेव्हा मुरुमाची अवैध वाहतूक करणारे 2 ट्रॅक्टर पकडण्यात आले.मुरूम वाहतूकसाठी रॉयल्टी बाबत चालकांना विचारपूस केली असता चालकांनी उडवाउडवीची उत्तरे दिली.म्हणून दोन्ही ट्रॅक्टर जप्त करून बुलडाणा तहसील कार्यालयात आणले असून दंडात्मक करवाई करणार आहे

FM REDIO

spot_img

live Cricket Score

Latest

FM REDIO 2

पुरवठा विभागाच्या मुंबई येथील दक्षता पथकाची खामगाव जवळ "गॅस-कॅप्सूल" वर मोठी धाड,खामगाव परिसरातील गॅस माफियांचे धाबे दणाणले बुलडाणा - 29 जुलै, मिरर न्युज नेटवर्क मागील काळात संपूर्ण देशभर गॅस टंचाई जाणवत...
spot_img
error: Content is protected !!