Breaking!!!देऊळघाट येथे 2 गटात राडा,भाजप युवा नेते नंदू लवंगेसह 6 जणावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू,गावात अतिरिक्त पोलीस दल तैनात

More articles

देऊळघाट येथे 2 गटात राडा,भाजप युवा नेते नंदू लवंगेसह 6 जणावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू,गावात अतिरिक्त पोलीस दल तैनात

बुलडाणा – 17 एप्रिल, मिरर न्युज नेटवर्क

बुलडाणा तालुक्यातील देऊळघाट येथे आज 17 एप्रिल रोजी सकाळी 9 वाजेच्या सुमारास क्षुल्लक कारणावरून 2 गटात राडा होऊन 2 ते 3 ठिकाणी मारहाण झाल्याच्या घटना घडल्या आहे.या मारहाणीत भाजप युवा नेते नंदू लवंगे यांच्यासह दोन्ही गटातील जवळपास 6 जण जखमी झाले असून त्यांच्यावर बुलडाणा येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहे.गावात तणावपूर्ण शांतता असून मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आल्याची माहिती बुलडाणा ग्रामीणचे ठाणेदार गजानन कांबळे यांनी दिली आहे.
        याबाबत प्राप्त माहिती अशी की,काल देऊळघाट येथील वरात जालना जिल्ह्यातील गोद्री येथे गेली होती.या ठिकाणी वरातीत नाचण्याच्या कारणावरून देऊळघाट येथील तरुणात वाद झाला होता.त्या ठिकाणी काही लोकांनी त्यांना शांत केले.हाच राग मनात धरून आज एका टोळक्याने धनगर वाड्यातील तरुणांना मारहाण केली यावेळी भाजपा युवा नेते नंदू लवंगे यांच्यावर सुद्धा प्राणघातक हल्ला करून त्यांच्या कारची तोडफोड करण्यात आली.तसेच प्रचंड दगडफेक देखील करण्यात आली होती. देऊळघाटच्या बस स्टँडवर ऋषिकेश सुसर या तरुणाला 8 ते 10 जणांनी बेदम मारहाण केली असून या मारहाणीचा व्हिडिओ समाज माध्यमावर व्हायरल झालेला आहे. घटनेची माहिती मिळताच बुलडाणा ग्रामीणचे ठाणेदार गजानन कांबळे कुमक घेऊन गावात दाखल झाले व परिस्थिती नियंत्रणात आणली. तसेच अतिरिक्त पोलीस दल गावात तैनात करण्यात आलं आहे.नंदू लवंगे,गणेश सुसर,सोपान लवंगे,शिवाजी सुसर, ऋषिकेश सुसर आणि रावसाहेब जाधव हे या राड्यात जखमी झाले असून त्यांच्यावर सद्या जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहेत.पोलिसांनी जिल्हा सामान्य रुग्णालयात जाऊन जखमींचे बयान नोंदवले पुढील कारवाई सुरू आहे.

FM REDIO

spot_img

live Cricket Score

Latest

FM REDIO 2

पुरवठा विभागाच्या मुंबई येथील दक्षता पथकाची खामगाव जवळ "गॅस-कॅप्सूल" वर मोठी धाड,खामगाव परिसरातील गॅस माफियांचे धाबे दणाणले बुलडाणा - 29 जुलै, मिरर न्युज नेटवर्क मागील काळात संपूर्ण देशभर गॅस टंचाई जाणवत...
spot_img
error: Content is protected !!