गरज नसलेल्या ठिकाणी उभारला ब्रेकर?? मूर्ती फाट्या जवळच्या ब्रेकरवर दुचाकीचा अपघात, बाळासह आई-वडील गंभीर जखमी

More articles

गरज नसलेल्या ठिकाणी उभारला ब्रेकर?? मूर्ती फाट्या जवळच्या ब्रेकरवर दुचाकीचा अपघात, बाळासह आई-वडील गंभीर जखमी

बुलडाणा – 9 मार्च, मिरर न्युज नेटवर्क

मोताळा तालुक्यातील रोहिणखेड येथील रहिवासी एक परिवार आपल्या दुचाकीने बुलडाणाकडे जात असतांना मूर्ती फाट्या जवळ नवीन टाकण्यात आलेल्या ब्रेकरचा अंदाज न आल्यामुळे दुचाकीचा अपघात होऊन बाळासह आई-वडील गंभीर जखमी झाले.ही घटना आज 9 मार्चला दुपारी 4 वाजेच्या सुमारास घडली आहे.
            या बाबत प्राप्त माहिती अशी की बुलडाणा ते मलकापूर महामार्गावर मूर्ती फाट्या जवळ अलीकडच्या काळात गरज नसलेल्या सरळ मार्गावर नवीन ब्रेकर टाकण्यात आला आहे.रोहिणखेड येथील एक परिवार आपल्या दुचाकीने बुलडाणाकडे जात असताना या ब्रेकरचा अंदाज ना आल्याने दुचाकीचा अपघात होऊन यात मोहम्मद सोहेल अब्दुल हमीद वय 35 वर्ष, शबाना मोहम्मद सोहेल वय 28 वर्षे आणि मोहम्मद अली मोहम्मद सोहेल वय 8 वर्ष हे तिघे जण गंभीर जखमी झाले. त्यांना तात्काळ बुलडाणा येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले परंतु मोहम्मद अली या बाळाच्या डोळ्याला गंभीर दुखापत झाल्याने पुढील उपचारासाठी जालना येथे रेफर करण्यात आले आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने गरज नसलेल्या ठिकाणी ब्रेकर उभारल्याने आतापर्यंत अनेक अपघात या ब्रेकरमुळे घडल्याची माहिती परिसरातील नागरिकांनी दिली आहे. हा धोकादायक ब्रेकर संबंधित विभाग काढणार का?? असा प्रश्न नागरिकाकडून उपस्थित केला जात आहे.

FM REDIO

spot_img

live Cricket Score

Latest

FM REDIO 2

पुरवठा विभागाच्या मुंबई येथील दक्षता पथकाची खामगाव जवळ "गॅस-कॅप्सूल" वर मोठी धाड,खामगाव परिसरातील गॅस माफियांचे धाबे दणाणले बुलडाणा - 29 जुलै, मिरर न्युज नेटवर्क मागील काळात संपूर्ण देशभर गॅस टंचाई जाणवत...
spot_img
error: Content is protected !!