बुलडाणा तहसीलदार एक्शन मोडवर,वरवंड येथे अवैध वाळू वाहतूक करणारा टिप्पर पकडला

More articles

बुलडाणा तहसीलदार एक्शन मोडवर,वरवंड येथे अवैध वाळू वाहतूक करणारा टिप्पर पकडला

बुलडाणा – 16 जानेवारी, मिररर न्युज नेटवर्क

तालुक्यात अवैध रेतीची वाहतूक सुरूच आहे. महसूल प्रशासनाकडून रेतीची अवैध वाहतूक थांबविण्यासाठी कारवाया सुरू असताना देखील वाळू तस्कर प्रशासनाला चकमा देण्याचा प्रयत्न करतात. असाच 1 टिप्पर आज 16 जानेवारीला सकाळी 11 वाजेच्या सुमारास वरवंड येथे बुलडाणा तहसीलदार विठ्ठल कुमरे यांच्या पथकाने गस्तीवर असतांना पकडले आहे.
           बुलडाणा जिल्ह्यात अवैध वाळू तस्करीला लगाम लावण्यासाठी जिल्हाधिकारी डॉ.किरण पाटील यांनी सर्व उपविभागीय अधिकारी, तहसीलदार यांना कारवाई करण्याचे आदेश निर्गमित केले आहे.या आदेशाचे पालन करत बुलडाणा तहसीलदार यांनी अवैध वाळू वाहतूक रोखण्यासाठी विशेष पथक स्थापन केलेले आहे.आज गुरुवारी सकाळी बुलडाणा तहसीलच्या पथकातील सदस्य रंजना पाटील तलाठी वरवंड, गोपाल राजपूत तलाठी बुलडाणा आणि वाहन चालक अशोक देवकर हे गस्तीवर असतांना त्यांना वरवंड येथे रेतीची वाहतूक करतांना एमएच 28 बीबी – 4060 क्रमांकाचा टिप्पर दिसला असता त्याला थांबवून रॉयल्टी बाबत चौकशी केली असता चालक मंगेश अवसरमोल याने उडवाउडवीची उत्तरे दिल्याने सदर टिप्पर पकडून बुलडाणा येथील निवडणूक विभागाच्या इमारती परिसरात लावण्यात आला असून दंडात्मक कारवाई सुरू असल्याची माहिती तहसीलदार विठ्ठल कुमरे यांनी दिली आहे.

FM REDIO

spot_img

live Cricket Score

Latest

FM REDIO 2

पुरवठा विभागाच्या मुंबई येथील दक्षता पथकाची खामगाव जवळ "गॅस-कॅप्सूल" वर मोठी धाड,खामगाव परिसरातील गॅस माफियांचे धाबे दणाणले बुलडाणा - 29 जुलै, मिरर न्युज नेटवर्क मागील काळात संपूर्ण देशभर गॅस टंचाई जाणवत...
spot_img
error: Content is protected !!