साखरखेर्डा येथे मोहरमच्या मिरवणुकीवर दगडफेक, लाठी चार्ज करत अश्रू धुराचे नडकांड्या फोडले, काहीजण जखमी,गावात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात, तणावपूर्ण शांतता
बुलडाणा – 18 जुलै, मिरर न्यूज नेटवर्क
मागील काही वर्षा अगोदर साखरखेर्ड्यात हिंदू – मुस्लिम दंगल उसळली होती. त्यात मोहम्मद ताज या तरुणाचा मृत्यू झाला होता. या दंगली नंतर पोलीस प्रशासन व गावातील प्रतिष्ठित नागरिकांनी समन्वय साधून तेथील सामाजिक परिस्थिती सामान्य केली होती.आता पुन्हा साखरखेर्डावर दंगलीचा दाग लागला आहे. आज 18 एप्रिलला सायंकाळी 6 वाजेच्या सुमारास माळीपुरा येथून मोहरमची मिरवणूक जात असताना अचानक मिरवणुकीवर दगडफेक सुरू झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. दगडफेकीत काहीजण जखमी झाले असून यात पोलीस कर्मचाऱ्यांचा देखील समावेश असल्याचे समजते. परिस्थिती नियंत्रण नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी सौम्य लाठीचार्ज करत अश्रू धुराचे नळकांड्या फोडले.
माहिती मिळताच तात्काळ पोलिसांची अधिक कुमक साखरखेर्डात दाखल झाली असून सध्या तणावपूर्ण शांतता आहे. मिरवणूकितील ताजियाचे विसर्जन देखील झालेले नाही. हुल्लडबाज पोरामुळे ही घटना घडली असून पोलीस प्रशासन लक्ष ठेवून आहे, तसेच अप्पर पोलीस अधीक्षक बी.बी. महामुनी, साखरखेर्डा येथे पोहोचल्याची माहिती बुलडाणा एसपी सुनील कडासने यांनी “बुलडाणा मिरर”ला दिली आहे.