चिखला घाटातील थरार,,, एसडीओ,तहसीलदारांनी पाठलाग करून पकडला अवैध वाळूचा टिप्पर

More articles

चिखला घाटातील थरार,,, एसडीओ,तहसीलदारांनी पाठलाग करून पकडला अवैध वाळूचा टिप्पर

बुलडाणा – 6 मार्च,मिरर न्युज नेटवर्क

बुलडाणा ते धाड महामार्गावरील चिखला घाटात समोरून येणाऱ्या अवैध वाळु वाहतुकीच्या टिप्परला हात देऊनही न थांबल्यामुळे बुलडाणा उपविभागीय अधिकारी व तहसीलदार यांनी आपले शासकीय वाहन फिरवून त्या टिप्परचा पाठलाग करून त्याला पकडले आहे. ही कारवाई आज 6 मार्च राजी सकाळी 11 वाजेच्या सुमारास करण्यात आली.या कारवाईमुळे बुलडाणा तालुक्यातील वाळु माफिया मध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
बुलडाणा तालुक्यात एकही वाळूचा घाट नसल्यामुळे बुलडाणा जिल्ह्याच्या सीमेला लागून असलेल्या जालना जिल्ह्यातील जाफराबाद कडून बुलडाणा शहरात अवैध वाळूची तस्करी होत असते. याच वाळू तस्करी मुळे उमेश फदाट या तरुणाचा इरला परिसरात निर्गुण खुन करण्यात आला. प्रशासनाकडून अवैध वाळू वाहतूक थांबवण्यासाठी उपाययोजना केल्या जात असल्या तरी वाळूमाफिया बेभान झाल्याचे दिसून येत आहे. रात्री तर सोडा आता दिवसाढवळ्या देखील वाळूची अवैध वाहतूक केली जात आहे.आज 6 मार्चला बुलडाणा उपविभागीय अधिकारी शरद पाटील व बुलडाणा तहसीलदार विठ्ठल कुमरे हे सैलानीच्या दिशेने आपल्या शासकीय वाहनाने जात असताना दुधा व चिखलाच्या दरम्यान समोरून एक टिप्पर येताना दिसले. त्याला हात देऊन थांबवण्याचा प्रयत्न केला. परंतु टिप्पर सुसाट वेगाने निघून गेला. यावेळी अधिकाऱ्यांनी तात्काळ आपले शासकीय वाहन फिरवून टिप्परचा पाठलाग केला व काही अंतरावर चिखला घाटाजवळ टिप्परला थांबून चौकशी केली असता अवैध वाळूची वाहतूक केली जात असल्याचे समोर आले आहे.नायब तहसीलदार अनंता पाटील, तलाठी गोपाल राजपूत यांना घटनास्थळी बोलविण्यात आले. त्यांनी पंचनामा केला व सदर टिप्पर पकडून बुलडाणा तहसील कार्यालयाच्या पाठीमागे निवडणूक विभागाच्या इमारतीच्या प्रांगणात लावण्यात आले आहे. टिप्पर मालक अमोल सोनुने विरुद्ध दंडात्मक कारवाई सुरू असल्याची माहिती उपविभागीय अधिकारी शरद पाटील यांनी दिली आहे.

FM REDIO

spot_img

live Cricket Score

Latest

FM REDIO 2

अनाधिकृत स्कूल व्हॅनच्या धडकेत दुसऱ्या तरुणाचाही उपचारा दरम्यान मृत्यू,दारुड्या चालकाच्या हलगर्जीपणा व आरटीओ विभागाच्या दुर्लक्षितपणामुळे 2 मित्रांनी गमावला जीव बुलडाणा - 25 फेब्रुवारी, मिरर न्युज नेटवर्क शाळा सुटल्यावर विद्यार्थ्यांना अनधिकृतरित्य आपल्या...
spot_img
error: Content is protected !!