अपघातानंतर दुचाकीला लागली आग,ज्ञानगंगा अभयारण्यातील घटना, धाड येथील दुचाकी चालक गंभीर जखमी

More articles

अपघातानंतर दुचाकीला लागली आग,ज्ञानगंगा अभयारण्यातील घटना, धाड येथील दुचाकी चालक गंभीर जखमी

बुलडाणा – 27 फेब्रुवारी, मिरर न्युज नेटवर्क

बुलडाणा ते खामगाव महामार्गावरील ज्ञानगंगा अभयारण्यात चिंच फाट्याजवळ दुचाकी व कारच्या अपघातानंतर दुचाकीने पेट घेतला होता. आज 27 फेब्रुवारीला सकाळी 11 वाजेच्या सुमार झालेल्या या अपघातात धाड येथील दुचाकी चालक तरुण गंभीर जखमी झाला असून त्याला पुढील उपचारासाठी छत्रपती संभाजी नगर औरंगाबाद येथे रेफर करण्यात आले आहे.
याबाबत प्राप्त माहिती अशी की, आयान खान रा.धाड, ता. बुलडाणा हा तरुण आज गुरुवारी सकाळी आपल्या दुचाकीने काही कामानिमित्त खामगावकडे जात असताना ज्ञानगंगा अभयारण्यातील चिंच फाट्याजवळ समोरून आलेली कार व दुचाकीची धडक झाली.हा अपघात इतका भयंकर होता की काही सेकंदातच दुचाकीने पेट घेतला व जळून खाक झाली.आयान खान हा गंभीर जखमी झाला होता त्याला अपघातग्रस्त कारच्या माणुसकी दाखवत चालकाने स्वतः त्याला उपचारासाठी बुलडाणा येथील रुग्णालयात आणले परंतु पुढील उपचारासाठी त्याला छत्रपती संभाजी नगर औरंगाबाद येथे पाठविण्यात आले आहे. या अपघाताप्रकरणी अद्याप पर्यंत बुलडाणा ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद नसल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

FM REDIO

spot_img

live Cricket Score

Latest

FM REDIO 2

अनाधिकृत स्कूल व्हॅनच्या धडकेत दुसऱ्या तरुणाचाही उपचारा दरम्यान मृत्यू,दारुड्या चालकाच्या हलगर्जीपणा व आरटीओ विभागाच्या दुर्लक्षितपणामुळे 2 मित्रांनी गमावला जीव बुलडाणा - 25 फेब्रुवारी, मिरर न्युज नेटवर्क शाळा सुटल्यावर विद्यार्थ्यांना अनधिकृतरित्य आपल्या...
spot_img
error: Content is protected !!