बाप रे,,,तिघांना सर्पदंश, जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारासाठी दाखल
बुलडाणा – 18 जुलै, मिरर न्युज नेटवर्क
सध्या पावसाळ्याचे दिवस सुरू आहे. शेतामध्ये पिकेही वाढले आहेत. अशावेळी सर्पदंशाच्या घटना घडत असतात.आज 18 जुलै रोजी सुद्धा 3 वेगवेगळ्या ठिकाणी सर्पदंशच्या घटना घडल्या आहे.यामध्ये मोताळा तालुक्यातील किन्होळा, गिरोली व बुलडाणा तालुक्यातील वरवंड येथे तिघांना सर्पदंश झाला. त्यांच्यावर जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहे.
पावसाळा सुरू होताच साप बिळातून बाहेर निघतात. शेत शिवार हिरवेगार असल्याने यात लपलेले साप दिसत नाही. शेतात काम करणाऱ्या शेतकरी व मजुरावर साप हल्ला करतो. पावसाळ्यात अशा घटना वाढत आहे. बुलडाणा जिल्ह्यात 3 ठिकाणी 3 जणांना शेतात काम करीत असताना सापाने चावा घेतल्याने त्यांना उपचारासाठी बुलडाणा येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल केले आहे.
यामध्ये दशरथ रामदास राठोड वय 60 वर्ष, रा. गिरोली ता. मोताळा, लताबाई अनिल वैराळकर वय 50 वर्ष, रा. किन्होळा ता. मोताळा आणि सीमा रवींद्र फासे वय 30 वर्ष रा.वरवंड ता.बुलडाणा या तिघांना आज 18 जुलै रोजी शेतात काम करत असताना सर्पदंश झाला. सध्या त्यांच्यावर जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहे.