यह तुमने क्या किया??? जिल्हा वाहतूक शाखेतील 2 कर्मचाऱ्यांचा पैसे घेतानाचा व्हिडिओ व्हायरल, समाजवादी पार्टीने केली तक्रार
बुलडाणा – 4 जुलै, मिरर न्युज नेटवर्क
वाहतूक शाखा शाखेतील कर्मचारी आपला कर्तव्य विसरून फक्त “वसुली” करीत असल्याचा आरोप नेहमी होत असतो.आता तर बुलढाणा जिल्हा वाहतूक शाखेतील 2 कर्मचारी “गोत्यात” आले असून समाजवादी पार्टीने त्यांच्यावर अरेरावी व दादागिरी करण्याचा आरोप करीत लेखी तक्रार केली आहे.तसेच यांचं पैसे घेतानाचा एक व्हिडिओ सुद्धा व्हायरल झाला आहे.
समाजवादी पार्टीचे जळगाव जामोद शहर अध्यक्ष सय्यद नफीस यांनी उपविभागीय पोलीस अधिकारी,मलकापूर यांच्याकडे दिलेल्या तक्रारीत नमूद केले आहे की बुलढाणा जिल्हा वाहतूक शाखेतील कर्मचारी आनंद पवार आणि इष्तियाक खान हे दोन्ही कर्मचारी आपल्या पदाचा गैरवापर करून वाहनधारकावर दादागिरी व दमदाटी करतात,इतकेच नव्हे तर “ऑन-ड्युटी” दारूच्या नशेत असतात. वाहनधारकांना नियमांचा धाक दाखवून दंड आकारण्याच्या नावावर अवैध वसुली करतात. याच दोन कर्मचाऱ्यांचा वाहनधारकांकडून पैसे घेण्याचा व्हिडिओ व्हायरल झालेला आहे.याप्रकरणी जिल्हा वाहतूक शाखेतील कर्मचारी आनंद पवार व इष्तियाक खान यांच्याविरुद्ध वरिष्ठ अधिकाऱ्याकडे आपण तक्रार केली असून त्यांना निलंबित करण्याची मागणी केल्याची माहिती सय्यद नफीस यांनी दिली आहे.