ट्रकने 15 मेंढ्या चिरडल्या, महामार्गावर मेंढपाळांचा गोंधळ,बराच वेळ होती वाहतूक कोंडी,,बुलढाणा जिल्ह्यात कुठे घडली घटना????
सिंदखेडराजा – 29 जून, मिरर न्युज नेटवर्क
भरधाव वेगात असलेला ट्रक रसत्याने जात असलेल्या 30 ते 40 मेंढ्यांच्या कळपात शिरल्याने जवळपास 15 मेंढ्या ठार झाल्याची घटना बुलढाणा जिल्ह्यातील नागपुर – मुंबई महामार्गावारील सावरगाव घाटात घडली आहे.हा अपघात आज 29 जून रोजी दुपारी 4 वाजेच्या सुमारास घडला.
या बाबत प्राप्त माहिती अशी की मेंढपाळ 30 ते 40 मेंढ्या घेऊन सिंदखेड राजा तालुक्यातील सावरगाव घाटातून जात होता, याच वेळी एक मालवाहू ट्रक सिंदखेडराजा येथून जालन्याकडे जात असताना सावरगाव घाटात अचानक ट्रक चालकाचा ताबा सुटला आणि ट्रक मेंढ्यांच्या कळपात शिरल्याने अंदाजे 15 मेंढ्या चिरडल्या गेल्या.या अपघातानंतर मेंढपाळाने ट्रकला घेराव घालून पैशांची मागणी केली.त्यामुळे बराच वेळ या महामार्गावर वाहतूक कोंडी झाली होती.सावरगाव येथील काही नागरिकांनी येऊन वाहतूक सुरू केली,मात्र मेंढपाळ गोंधळ घालत असून चालकाला ट्रकमधून खाली उतरू देत नाही. घटनेची माहिती मिळाल्याने पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतल्याची माहिती मिळत आहे.