रायपूर पोलिसांनी “वाळू”ची अवैध वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टर पकडले,,,अन् कारवाई ना करताच का सोडले??? जिल्हा पोलीस अधीक्षकाकडे केली तक्रार,,काय झालं देवाणघेवाण???
बुलडाणा – 24 जून, मिरर न्युज नेटवर्क
वाळू माफियाकडून पोलिसांची हप्तेखोरी हे काही नवीन नाही.ज्या वाळूमाफियाने हातमिळवणी केली नाही त्यांच्यावर हमखास कारवाई होतेच.अधून मधून जर एखादा रेतीचा वाहन हाती लागला तर त्याच्याकडून “अर्थपूर्ण” व्यवहार करत आपला “उल्लू” सरळ करण्यात येतो आणि त्या वाहनाला बाहेरच्या बाहेर सोडून देण्यात येते,परंतु जर वाळूची अवैध वाहतूक करण्याऱ्या वाहनाला पकडून पोलीस ठाण्यात लावून सुद्धा विना कारवाई त्याला सोडण्यात आले तर आपण याचा अर्थ काय काढणार???? अशीच घटना बुलडाणा तालुक्यातील रायपूर पोलीस ठाण्यात घडली आहे. रायपूर पोलीस ठाण्यात कार्यरत कर्मचाऱ्यांची तक्रार जिल्हा पोलीस अधिक्षकाकडे आज 24 जूनला करण्यात आली.
मोहम्मद शमीम मोहम्मद वसीम सौदागर रा. रायपूर, ता. जि. बुलडाणा यांनी जिल्हा पोलीस अधीक्षकाकडे दिलेल्या तक्रारीत नमूद केले आहे की 22 जून रोजी रायपुर ते सैलानी रोडवर अवैधरित्य रेतीची वाहतूक करणाऱ्या एका ट्रॅक्टरला रायपूर पोलिसात कार्यरत पोलीस कर्मचारी अनंत कळमकर यांनी पकडले व त्यांनी सदर ट्रॅक्टर रायपूर पोलीस ठाण्याच्या आवारात लावून दिले. सदर ट्रॅक्टर रायपूर येथील मोबीन नाईन यांचा असून पोलिसांनी गौण खनिजाची चोरी करणाऱ्या ट्रॅक्टर चालक किंवा मालका विरुद्ध कोणतीही कारवाई केली नाही.उलट ट्रॅक्टरला काही तासानंतर सोडून देण्यात आले आहे. ट्रॅक्टर का सोडण्यात आले व त्याच्यावर योग्य ती कारवाई का करण्यात आली नाही??? असा प्रश्न उपस्थित करत संबंधितावर कारवाई करण्याची मागणी निवेदनात शमीम सौदागर यांनी केली आहे.
कळमकर आणि गव्हाणे यांची भूमिका संशयास्पद???
याप्रकरणी अधिक माहिती घेतली असता असे समोर आले की जवळपास अर्धा ट्रॉली रेती घेऊन जाणाऱ्या ट्रॅक्टरला रायपूर पोलीस ठाण्यातील खुफिया विभागात कार्यरत पोलीस कर्मचारी अनंता कळमकर यांनी पकडले व त्यांनी चालकाला वाळूची रॉयल्टी बाबत विचारपूस केली असता चालकाने रॉयल्टी दाखवली नाही म्हणून ट्रॅक्टरला ठाण्यात आणून उभे करण्यात आले. बुलडाण्यात पोलीस भरती सुरू असल्याने ठाणेदार दुर्गेश राजपूत हे भरतीत व्यस्त होते.सदर ट्रॅक्टर मध्ये गौण खनिज असल्या कारणाने नियमानुसार पोलिसांनी याबाबतचा पत्रव्यवहार बुलढाणा तहसीलदारांशी करणे क्रमप्राप्त होते परंतु असे ना करताच साहेबांचे रायटर राजू गव्हाणे आणि खुफियाचे कर्मचारी अनंता कळमकर यांनी सदर ट्रॅक्टर परस्पर सोडून दिले. आता प्रश्न उपस्थित होतो की पोलिसांनी ट्रॅक्टर का सोडले???तर याचे उत्तर सगळ्यांना माहीतच आहे. तर या प्रकरणात आर्थिक देवाण-घेवाण झाल्याची चर्चा संपूर्ण रायपूर मध्ये जोमात सुरू आहे.
एमव्ही ऍक्ट प्रमाणे कारवाई केल्याचा दावा
रायपूर पोलिसाद्वारे पकडण्यात आलेल्या ट्रॅक्टरला काही तासानंतर सोडून देण्यात आले होते. याबाबतची माहिती मिळाल्यानंतर जेव्हा रायपुर ठाणेदार दुर्गेश राजपूत यांचे रायटर राजू गव्हाणे यांना विचारणा केली असता ते सदर ट्रॅक्टर मध्ये थोडीच रेती होती म्हणून त्या वाहनावर एमव्ही ऍक्ट प्रमाणे कारवाई करून त्याला सोडून देण्यात आले आहे.आता हा उत्तर किती खरा आणि किती खोटा हे त्यांनाच माहित, परंतु आता वाहनांना दंड करण्याचा सिस्टम ऑनलाइन झालेला आहे त्यामुळे 22 तारखेला सदर ट्रॅक्टर वर खरंच एमव्ही ऍक्ट प्रमाणे कारवाई करण्यात आली का?? हा सुद्धा तपासाचा भाग झाला.