पोलीस आहे की पक्षाचा कार्यकर्ता??? नांदुऱ्यात मुस्लिम समाजाला “तुतारी”ला मतदान करण्यास पाडले भाग,आता एसपीकडे झाली तक्रार
बुलडाणा – 22 मे, मिरर नेटवर्क
आपला कर्तव्य विसरून एका पोलीस कर्मचाऱ्यांने लोकसभा निवडणुकीत “तुतारी” या चिन्हावर मुस्लिम समाजाला मतदान करण्यासाठी भाग पाडले, असा गंभीर आरोप जिल्हा पोलीस अधीक्षक यांना दिलेल्या निवेदनात करण्यात आला आहे.
मागील 13 मेला रावेर लोकसभा मतदार संघाची निवडणूक पार पडली. बुलडाणा जिल्ह्यातील मलकापूर विधानसभा मतदारसंघ हा रावेर लोकसभा मतदारसंघात आहे. रावेर लोकसभा निवडणुकी दरम्यान आ.राजेश एकडे यांच्यासोबत नांदुरा पोलीस ठाण्यात कार्यरत पोलीस कर्मचारी विनोद काशीराम भोजने यांनी राष्ट्रवादी शरद पवार गटाचे उमेदवार श्रीराम दयाराम पाटील यांच्या तुतारी या चिन्हावर मुस्लिम समाजाला मत देण्यासाठी भाग पाडले. असा आरोप बुलडाणा जिल्हा पोलीस अधीक्षक यांना आज 22 मे रोजी दुपारी दिलेल्या तक्रारीत नांदुरा येथील मो.साजिद अब्दुल रशीद यांनी केले आहे.या संदर्भात त्यांनी पोलीस कर्मचाऱ्याविरुद्ध कोर्टात जाण्यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षकांची परवानगी मागितली आहे.