मुंबई बोट दुर्घटनेत देवदूत बनून आलेल्या मोहम्मद आरिफने 25 लोकांचे वाचवले प्राण
मुंबई – 19 डिसेंबर, मिरर न्युज नेटवर्क
मुंबईच्या गेटवे ऑफ इंडिया परिसरातील समुद्रात 18 डिसेंबरच्या दुपारी एक प्रवासी बोट उलटल्याने या अपघातात 13 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.नीलकमल नावाची बोट गेटवे ऑफ इंडियावरून एलिफंटाकडे जात असतांना नेव्हीच्या बोटीनं जोरदार धडक दिली त्यामुळे निलकमल बोटीला छिद्र पडला व त्यात पाणी शिरल्याने बोट बुडू लागली.त्यामुळे बोटी मधील लोकांची समुद्रात मृत्यूशी झुंज सुरू झाली. जीव वाचवण्यासाठी प्रत्येकाची धडपड सुरू होती.या बोटीवर मुंबईबाहेरीलदेखील पर्यटकही होते.अपघात झाल्यानंतर पहिल्या 30 मिनिटात दुसऱ्या बोटीवर असलेल्या मोहम्मद आरीफ बोमन समुद्रात बुडणाऱ्या 25 जणांसाठी देवदूत ठरले.
आरिफ बोमन पहिल्या 30 मिनिटात ठरला देवदूत
समुद्रात हा थरार सुरू असतानाच बोटी बुडल्याच कळताच पूर्वा बोटावरील आरिफ बोमने पुढच्या क्षणी लोकांना रेस्क्यू करण्यासाठी पोहोचले. मदत कार्य येण्यापूर्वीच आरिफ बोमने याने जवळपास 25 जणांना रेस्क्यू करत सुखरुप पाण्या बाहेर काढत त्यांची सुटका केली. ज्यावेळी आरिफ दुर्घटनाग्रस्त बोटीजवळ पोहोचले ते दृष्य पाहून त्यांच्या पायाखालची जमीन सरकली. लोकांचा आक्रोश आणि वाचवा वाचवा अशी हाक ऐकू येत होती आणि हे सगळं निशब्द करणारे दृश्य समोर होतं. समोर मृत्यू दिसणाऱ्या त्या निष्पाप जिवांना वाचवण्यासाठी आरिफ समोर आले आणि शक्य तितक्या लोकांना मृत्यूच्या दाढेतून बाहेर काढला.
ज्या बोट दुर्घटनेनं संपूर्ण महाराष्ट्र हळहळतोय, त्या घटनेचे साक्षीदार ठरलेले आरिफ यांनी तो थरारक प्रसंग सांगितला. क्षणाचाही विलंब न करता त्यांनी लोकांना वाचवण्यासाठी अथक प्रयत्न केले. ज्या लोकांजवळ लाइफ जॅकेट नव्हते त्यांना ते देऊन त्यांना बोटीवर सुखरुप घेण्यात आले. आरिफ यांनी सांगितलं की, अपघात इतका भयानक होता की, 5 ते 10 मिनिटातच बोट समुद्रात बुडाली. त्याक्षणी बोटीवरील काही लोकांना लाइफ जॅकेट मिळवण्यात यश आलं पण काही लोक अपयशी ठरले.
साडेतीन वर्षांच्या मुलीचा असं वाचवलं प्राण
शक्य तितक्या लोकांना वाचवण्यासाठी आरिफ धडपडत होते. इतक्यात त्यांचं लक्ष एका छोट्या मुलाकडे गेलं. या रेस्क्यू ऑपरेशनच्या वेळी आरिफ यांनी समुद्रात बुडत असलेली एका साडेतीन वर्षांच्या मुलीला जीवदान दिलं. मात्र पाण्यातून काढल्यानंतर त्या मुलीचा श्वासोच्छवास पूर्णपणे थांबल्याचं आरिफ यांच्या लक्षात आलं. त्यांनी लगेचच तिला पोटावर झोपवून तिच्या पोटातील पाणी बाहेर काढलं छाती दाबून. त्यामुळे तिचं श्वास परत सुरु झाला अन् तिच्या आईने या देवदूताचे आभार मानले. एका छोट्या मुलीचा जीव वाचवण्याची ही घटना ऐकून अनेकांच्या डोळ्यात पाणी येईल.
आरिफच्या रूपाने देव बघितला,,,,,
समोर मृत्यू दिसलेल्या त्या लोकांनी आरिफच्या रूपाने देव बघितला, हे मात्र निश्चित आहे.आरिफ यांची बोट ही एक पायलट बोट होती. पायलट बोट म्हणजे समुद्रातील मोठ्या बोटींना समुद्र किनाऱ्यावर आणण्यासाठी त्यांना दिशा देण्याच काम करतं. समोर मृत्यू दिसलेल्या त्या लोकांनी आरिफच्या रूपाने देव बघितला,हे मात्र निश्चित आहे.