बुलडाणा – 19 डिसेंबर, मिरर न्युज नेटवर्क
शिक्षणाच्या माध्यमाने अनेकांचा भविष्य घडविणारी बुलडाणा येथील जयस्तंभ चौकातील नगरपालिकेची उर्दू शाळा क्रमांक 1 या ब्रिटिशकालीन इमारत आता जमीनदवस्त करण्याचा काम सुरू झालेला आहे.
अजिंठा पर्वतरांगेवर वसलेल्या थंड हवेचे ठिकाण असल्याने बुलडाणा शहराला इंग्रजांनी जिल्हा मुख्यालय म्हणून घोषित केले होते.आजही बुलडाणा शहरात अनेक ब्रिटिशकालीन वास्तू पाहायला मिळत आहे. त्या काळात शहरातील मुख्य चौक म्हणून ओळख असलेल्या जयस्तंभ चौकात स्वातंत्र्यपूर्वी म्हणजेच 1908 पूर्वी प्रशस्त एक मजली इमारत बांधून त्यात उर्दू शाळा सुरू करण्यात आली होती. मजबूत बांधकाम असलेली या इमारतीत पहिली ते चौथीपर्यंत उर्दू शाळा सुरू करण्यात आली होती. स्वातंत्र्यानंतर याच इमारत मध्ये नगरपालिकेची मराठी शाळा क्रमांक 3 सुरू करण्यात आली. या एकच इमारतीत नगरपालिकेच्या उर्दू आणि मराठी शाळेत अनेकांनी शिक्षणाचे धडे घेतले.जवळपास 116 वर्ष झाल्याने ही इमारत आता जर्जर झालेली आहे.या ठिकाणी नवीन इमारत उभारण्यासाठी शासनाकडून मंजुरी मिळाली असून ब्रिटिशकालीन ही इमारत आता पाडली जात असल्याची माहिती उर्दू शाळेचे मुख्याध्यापक मो. अजीम यांनी दिली आहे.