इमारतीवर स्वातंत्र्य दिनाची रोषणाई मात्र “गांधीजी” अंधारात,जंगम साहेब गांधीजींच्या पुतळ्याची दिशा बदला हो,,,
बुलडाणा – 14 ऑगस्ट, कासिम शेख, मिरर न्युज नेटवर्क
मागच्या काळात बुलडाणा जिल्हा परिषदेने कमिशन खोरीत सर्व रेकॉर्ड मोडल्याची चर्चा तेथील कर्मचारी स्वतः करतात. सध्या काय परिस्थिती आहे हे उजेडात आले नसले तरी लवकरच याचा उलगडा होईल. उद्या देशात 78 वा स्वातंत्र्य दिन साजरा होणार आहे त्यामुळे शासनाकडून “हर घर तिरंगा” अभियान राबविला जात आहे. अशात जिल्ह्यातील अनेक शासकीय इमारतीवर तिरंगी रोषणाई करण्यात आली आहे.त्यात प्रामुख्याने जिल्हा मुख्यालयातील जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा परिषदेचा समावेश आहे. जिल्हा परिषदेची मुख्य इमारत, छत्रपती शिवाजी महाराज सभागृह तसेच वित्त विभागाची बिल्डिंग तिरंगी रोषणाईने झगमगत असली तरीही देशाला अहिंसेचा पाठ शिकवणारे,देशाला स्वातंत्र्य मिळवून देणारे आपले ‘बापूजी” (महात्मा गांधी) अंधारात उभे आहे. “महात्मा”ची अशी प्रशासकीय उपेक्षा का? असा प्रश्न देशप्रेमींच्या मनात उपस्थित होत आहे.
बुलडाणा जिल्हा परिषदेचे तत्कालीन अध्यक्ष त्र्यंबक भिकाजी पाटील यांच्या कार्यकाळात महात्मा गांधींचा पूर्ण आकृती पुतळा जिल्हा परिषदेच्या मुख्य इमारतीच्या समोर बसविण्यात आला होता. महात्मा गांधींचा पुतळा इमारतीच्या दिशेने असणे गरजेचे होते परंतु पुतळ्याची पाठ मुख्य इमारतीच्या दिशेने असल्याने जिल्हा परिषदेत येणाऱ्यांना गांधीजींची पाठ दिसते. या पुतळ्याची दिशा बदलली पाहिजे अशी मागणी अनेक वेळा होत आली आहे परंतु कोणीही याकडे लक्ष दिले नाही. आता एक कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून ओळखले जाणारे कुलदीप जंगम बुलडाणा जिल्हा परिषदेला मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून रुजू झालेले आहे. त्यांनी बापूंच्या पुतळ्याची दिशा बदलून त्यावर कायमस्वरूपी रोषणाईची व्यवस्था करणे गरजेचे झाले आहे.