एसपी साहेब,,जिल्ह्यातील वाहतूक पोलीस कर्मचाऱ्यांना आवरा हो, 500 रुपयांसाठी ट्रक चालकांकडून एएसआयला खालच्या स्तरावर शिवीगाळ,व्हीडिओ होतोय व्हायरल
बुलडाणा जिल्हा वाहतूक शाखेतील 2 कर्मचाऱ्यांनी (आनंद पवार व इष्तियाक खान) नांदुरा ते जळगाव जामोद मार्गावर एका वाहन चालकाकडून अवैधरित्य पैसे घेतल्याचा व्हिडिओ नुकताच व्हायरल झाला. याची तक्रार देखील समाजवादी पार्टीने जिल्हा पोलीस अधीक्षकाकडे केली आहे तरीही अद्याप पर्यंत या दोघांवर कोणतीच कारवाई झाली नाही. हे प्रकरण गाजत असतानाच नागपूर- धुळे राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 53 वर एका एएसआयला ट्रक चालकाने खालच्या स्तरावर शिवीगाळ केल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.वाहतूक शाखेतील कर्मचाऱ्यांचे व्हायरल होणारे व्हिडिओ मुळे पोलीस प्रशासनाची प्रतिमा मलिन होत असून वरिष्ठ अधिकारी याकडे लक्ष का देत नाही? गैरकृत्य करणाऱ्या कर्मचाऱ्यांना निलंबित का करत नाही? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
बुलडाणा जिल्ह्यात काही वाहतूक कर्मचारी आपल्या पदाचा गैरवापर करतानाचे प्रकार समोर आले आहे.पोलीस प्रशासनाची लक्तरे वेशीवर टांगणाऱ्या या महाभागांवर मात्र पोलीस अधीक्षकांकडून आता पर्यंत कुणावरही कारवाई झाली नसल्याने गुंड बनलेले काही पोलिसवाले सुसाट झाले आहे.आता एक नवीन व्हिडीओ समोर आलेला असून यामध्ये खामगाव ग्रामीण पोलीस स्टेशनमध्ये कार्यरत एएसआय सुभाष रिंढे राष्ट्रीय महामार्गावर पैश्यासाठी स्वतःच्या कार ने ट्रकचा पाठलाग करतांना आणि त्याला थांबविल्या नंतर शिव्या खातांना दिसून येत आहे. ट्रक, ट्रॅव्हल आणि लहान बस चालकांना अडवून त्यांना कारवाईचा धाक दाखवून चालकांकडून पैसै उकळले जात आहेत. चालकांची सर्रासपणे लूट केली जात आहे.पैसे न दिल्यास पोलिसाकडून चालकांना नाहक मारहाण करून त्रास दिला जात असल्याचा आरोप चालकवर्ग करीत आहे. कुठलेही अधिकार नसतांना कुठलेही आदेश नसतांना वाहने अडवून कारवाईचा धाक दाखवून स्वतःचे खिसे भरण्याचा या पोलिसांचा प्रताप सध्या सुरूच आहे. या वसुलीबाज पोलीस कर्मचाऱ्यांना लगाम घालून त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी,वाहन धारकांना कडून होत आहे.
ठाणेदाराला द्यावा लागतो का “हिस्सा”???
प्रत्येक ठाण्यात वाहतूक शाखा वेगळी स्थापन करण्यात आली आहे ठाण्याचा कार्यक्षेत्र तिथले वाहतूक व्यवस्था पाहून त्यात वाहतूक कर्मचाऱ्यांशी नियुक्ती करण्यात येते. या कर्मचाऱ्यांना वेगवेगळी मार्ग वाटून दिले जातात हे कर्मचारी विविध वाहनधारकाकडून वसुली करतात (टारगेट नुसार ऑनलाइन कारवाई देखील केली जाते) काही ठाणेदारांनी आपला हिस्सा ठरवून घेतलेला आहे. ठाणेदार साहेबांचा हिस्सा काढून आपल्याला काही वाचले पाहिजे या हिशोबाने वाहतूक कर्मचारी काम करीत असल्याची गोपनीय माहिती सूत्रांनी दिली आहे तर खामगाव ग्रामीण ठाण्यात वाहतूक कर्मचाऱ्याकडून ठाणेदार हिस्सा घेतात किंवा नाही हे लवकरच कळेल???