….अन्यथा जबाबदार अधिकाऱ्याला “याच” डबक्यात बसवणार,मनसे तालुका प्रमुख अमोल रिंढे यांनी का दिलं इशारा???
बुलडाणा – 8 जुलै,मिरर न्युज नेटवर्क
बुलडाणा हे जिल्हा मुख्यालयाचे ठिकाण आहे. सर्वच कार्यालय येथे असल्याने जिल्हाभरातील नागरिकांना आपापल्या कामासाठी येथे यावे लागतात. नागरिकांच्या सुविधेसाठी वेगवेगळे कार्यालय ना करता बिल्डिंगमध्ये वेगवेगळे कार्यालय असावे याच हेतूने बस स्टँडच्या समोर प्रशासकीय इमारत बांधण्यात आली आहे. बहुतांश विभागाचे शासकीय कार्यालय येथे आहेत. जिल्हाभरातून अनेक नागरिक आपल्या कामानिमित्त येत असतात, मात्र याच प्रशासकीय इमारतीच्या आवारामध्ये घाणीचे साम्राज्य पसरले असून,पावसामुळे अक्षरशा या परिसराला तलावाचे स्वरूप आलेले आहे, त्यामुळे जिल्हाभरातून आलेल्या नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला.याकडे तात्काळ उपाययोजना कराव्या अन्यथा याला जबाबदार असणाऱ्या अधिकाऱ्याला याच डबक्यात बसवणार असल्याचा इशारा मनसे बुलडाणा तालुका प्रमुख अमोल रिंढे पाटील यांनी दिला आहे.