चिंतामणी ट्रॅव्हल्सच्या लक्झरी बसला सिंदखेडराजा जवळ अपघात,अपघातात 17 प्रवासी जखमी
बुलडाणा – 7 जून, मिरर न्युज नेटवर्क
पुण्याहून यवतमाळच्या दिशेने निघालेली चिंतामणी ट्रॅव्हल्सच्या लक्झरी बसचा बुलडाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजा नजीकच्या सावखेड फाट्याजवळ अपघात झाला.ही दुर्घटना आज 7 जून रोजी सकाळी 6 वाजेच्या सुमारास घडली असून यात 17 प्रवासी जखमी झाले. त्यातील जवळपास 10 जखमींना पुढील उपचारासाठी जालन्यातील जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले तर किरकोळ जखमींवर स्थानिक रुग्णालयात उपचार करण्यात आले. जखमींमध्ये लहान बालकांना मोठ्या प्रमाणावर दुखापत झाली.
प्राप्त माहिती अशी की चिंतामणी ट्रॅव्हल्सची लक्झरी बस प्रवासी घेऊन काल रात्री पुण्याहून निघाली होती आज शुक्रवारी सकाळी लक्झरी बस सिंदखेडराजा तालुक्यातील सावखेड फाट्या जवळ पोहोचली असता चालकाला झोपेची डुलकी लागली त्यामुळे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने सदर ल बसने 2 ते 3 पलटी खाल्ली आणि त्यामध्ये प्रवाशांना गंभीर दुखापत झाली. गंभीर जखमींना तात्काळ उपचारासाठी जालना येथील शासकीय रुग्णालयात भरती करण्यात आले.