प्रतापरावांचा “ताप” झालं कमी, विजयराज शिंदे यांचा “बंड” झालं “थंड”
पत्रकार परिषदेत दिली माहिती
बुलडाणा – 8 एप्रिल
महायुती कडून बुलडाणा लोकसभेची अधिकृत उमेदवार म्हणून विद्यमान खा.प्रतापराव जाधव यांना उमेदवारी घोषित करण्यात आली आहे.भाजपा लोकसभा प्रचार प्रमुख व माजी आ. विजयराज शिंदे यांचं वारंवार शिवसेने कडून अपमान होत आहे असं आरोप भाजपाच्यावतीने करण्यात आला आणि अशात विजयराज शिंदे यांनी आपलं उमेदवारी अर्ज दाखल केलं आणि महायुतीतील धुसफूस समोर आली.शिंदे यांनी माघार घ्यावी या साठी मुख्यमंत्री शिंदे सह महायुतीतील अनेक नेत्यांनी विजयराज यांची मनधरणी केली तसेच 7 एप्रिलला नागपुरात भाजपा प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांच्या सोबत विजयराज यांची बैठक झाली व त्यांनी अर्ज मागे घेण्याची मागणी केली परंतु विजयराज हे मैत्रीपूर्ण लढतीसाठी इच्छुक असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली होती.मात्र भाजपा कडून माघार घेण्याचा दबाव असल्याने आपण बुलडाण्यात जाऊन कार्यकर्त्यांशी चर्चा करून निर्णय घेऊ,त्यानुसार आज 8 एप्रिलला बुलडाणा येथे विजयराज शिंदे यांच्या निवासस्थानी कार्यकरतांची बैठक झाली.त्यानंतर पत्रकार परिषद घेऊन विजयराज शिंदे आपला उमेदवारी अर्ज मागे घेणार अशी घोषणा आ.श्वेता महाले यांनी केली आहे.