सलग 28 तास चालला अस्वलाचा थरारक रेस्क्यू,,, विहिरीत पडलेल्या अस्वलाला वन विभागाने दिले जीवदान,, मोताळा तालुक्यातील तारापूर येथील घटना
बुलडाणा – 9 जानेवारी, मिरर न्युज नेटवर्क
भौगोल वातावरण पौष्टिक असल्याने बुलडाणा जिल्हयात अस्वलांची संख्या मोठी आहे. तर ज्ञानगंगा अभयारण्य आला अस्वलांची भूमी म्हणून ओळखले जाते यास अभयारण्याला लागून असलेल्या तारापूर परिसरात विहिरीत पडलेल्या एका मादी अस्वलाला तब्बल 28 तासांच्या अथक प्रयत्नानंतर सुखरूप बाहेर काढण्यात वन विभागाला यश आले असून त्याला आंबा बारवा अभयारण्यात सुखरूप सोडण्यात आले आहे.
मोताळा वनपरिक्षेत्रातील तारापूर येथे गजानन बदामसिंग रबडे यांच्या शेतातील विहिरीत एक मादी अस्वल पडल्याची घटना समोर आल्याने एकच खळबळ उडाली होती. घटनेची माहिती मिळताच बुलडाणा डीएफओ सरोज गवस यांनी तात्काळ रेस्क्यू पथकाला आवश्यक साहित्य घेऊन घटनास्थळी रवाना केले.विहिरीत पाणी असल्याने बेशुद्ध करणे योग्य नसल्याने फिजिकल रेस्क्यू करण्याचा निर्णय घेण्यात आला परंतु अस्वल विहिरीतील एका कपारीत जाऊन बसले होते त्यामुळे हे रेस्क्यू जिकरीचे ठरत होते. सलग 28 तास हे ऑपरेशन सुरू होते. अखेर 8 जानेवारीला दुपारी 1 वाजता त्या अस्वलाला मोठ्या मशागतीने पिंरजऱ्यात घेऊन विहिरीतून सुखरूप बाहेर काढण्यात आले. त्यानंतर अस्वलाला बुलडाण्यातील राणी बागेत आणले गेले, जिथे पशुवैद्यकीय अधिकारी डॉ.मेटागळे यांनी तिची प्राथमिक तपासणी केली असता मादी अस्वल पूर्णपणे सुदृढ असल्याने, वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली तिला संग्रामपूर तालुक्यातील अंबाबरवा अभयारण्यात नैसर्गिक अधिवासात मुक्त करण्यात आले आहे.
हा रेस्क्यू ऑपरेशन डीएफओ सरोज गवस, मोताळा आरएफओ पडवळ आणि पंकज आळसपुरे यांच्या नेतृत्वात रेस्क्यू टीमचे सदस्य संदीप माडवी, बाळासाहेब घुगे, पवन वाघ आणि इतर कर्मचारी व गावकऱ्यांच्या मदतीने यशस्वी केले आहे.

