पवित्र हज यात्रेला जात आहे का???मग लसीकरण करून घ्या,23 एप्रिल रोजी बुलडाण्यात लसीकरण शिबिराचे आयोजन
बुलडाणा – 21 – एप्रिल, मिरर न्युज नेटवर्क
पवित्र हज यात्रेसाठी जिल्ह्यातून निवड झालेल्या 250 यात्रेकरूंना मेनिंजायटीस, पोलिओ आणि इन्फ्लूएंझा या आजारांपासून संरक्षण मिळावे यासाठी लसीकरण शिबिराचे आयोजन 23 एप्रिल रोजी सकाळी 9 ते दुपारी 12 वाजेच्या दरम्यान बुलडाणा येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात करण्यात आले आहे.
बुलडाणा जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. भागवत भुसारी यांनी सांगितले की,सर्व हज यात्रेकरूंना तिन्ही लसी घेणे बंधनकारक आहे. याशिवाय 26 एप्रिल रोजी खामगावच्या सामान्य रुग्णालयातही सकाळी 9 ते दुपारी 12 वाजेपर्यंत लसीकरण करण्यात येणार आहे.हज कमिटीच्या वतीने लसीकरण स्थळी आरोग्य तपासणी,प्रशिक्षण कार्ड आणि डायरीचे वितरणही करण्यात येणार आहे. लसीकरणाशिवाय हज यात्रेस जाणे शक्य नाही याची सर्वांनी नोंद घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.बुलडाणा येथे लसीकरण शिबिरात येणाऱ्या येणाऱयां येणाऱ्यांसाठी मरहुम सय्यद ईस्माइल उर्फ बब्बू सेठ डोंगरे यांचे तर्फे दारुल उलूम हुसेनिया मदरसा, मिर्झा नगर,बुलडाणा येथे जेवणाची व्यवस्था करण्यात आली आहे.

