“कहीं खुशी कहीं गम” बुलडाणा तालुक्यातील 66 ग्रामपंचायत सरपंच पदांची आरक्षण सोडत संपन्न
बुलडाणा – 16 एप्रिल, मिरर न्युज नेटवर्क
ग्रामविकास व जलसंधारण विभागाच्या अधिसूचने नुसार महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियमाचे कलम 30 अन्वये तसेच मुंबई ग्रामपंचायत सरपंच व उपसरपंच निवडणूक नियम 1964 मधील तरतुदीनुसार सन 2025 ते 2030 दरम्यान बुलडाणा तालुक्यातील सार्वत्रिक निवडणूकीद्वारे गठीत होणाऱ्या 66 ग्रामपंचायतीच्या सरपंच पदांची आरक्षण सभा आज 16 एप्रिल 2025 रोजी दुपारी 12 वाजेच्या सुमारास तहसिल कार्यालयच्या मागील बाजूस असलेल्या निवडणूक विभागाच्या इमारतीत पार पडली. यावेळी उपविभागीय अधिकारी शरद पाटील, तहसीलदार विठ्ठल कुमरे प्रामुख्याने उपस्थित होते.
आंभोडा,पाडळी,मढ, रायपूर,पांग्री,सिंदखेड, मातला,माळवंडी,म्हसला बु,सागावन,माळविहीर, जांब,कुंबेफळ,शिरपूर, दहिद बु,गिरडा, ढालसावंगी,पिंपळगाव सराई,साखळी खु, पळसखेड भट,अजितपुर, नांद्राकोळी,साखळी बु, धाड,देवपूर,कुलमखेड,रोईखेड टेकाळे,दहीद खु, साखळी,वरुड आणि उमाळा या 33 ग्रामपंचायतीचे सरपंच सर्वसाधारण प्रवर्गासाठी आरक्षित आहे.तर देऊळघाट,सोयगाव, सातगाव म्हसला,भडगाव, खुपगाव,वरवंड,दुधा, कोलवड,बोरखेड,केसापूर, तराडखेड,मासरूळ, चांडोळ,पळसखेड नागो,गुम्मी,दत्तपूर,ईरला आणि चौथा या 18 गावांचे सरपंच पद नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी आरक्षित आहे.चिखला,सावळा, मोंढाळा,हतेडी बु, घाटनांद्रा,चौथा,चांडोळ, येळगाव,हतेडी खु,जामठी जनुना आणि भादोला या 12 ग्रामपंचायतचे सरपंच पद अनुसूचित जाती करिता आरक्षित झालेले आहे.रुईखेड मायंबा, डोंगरखंडाळा आणि धामणगाव या 3 ग्रामपंचायतीचे सरपंच अनुसूचित जमाती करिता आरक्षित झालेले आहे. तसेच अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, नागरीकांचा मागास प्रवर्ग व खुल्या प्रवर्गा अंतर्गत स्त्रियांकरिता आरक्षण सोडत दिनांक 28 एप्रिल 2025 रोजी जिल्हा नियोजन समिती सभागृह, जिल्हाधिकारी कार्यालय बुलढाणा येथे निश्चित करण्यात येणार आहे.

