अनाधिकृत स्कूल व्हॅनच्या धडकेत दुसऱ्या तरुणाचाही उपचारा दरम्यान मृत्यू,दारुड्या चालकाच्या हलगर्जीपणा व आरटीओ विभागाच्या दुर्लक्षितपणामुळे 2 मित्रांनी गमावला जीव

More articles

अनाधिकृत स्कूल व्हॅनच्या धडकेत दुसऱ्या तरुणाचाही उपचारा दरम्यान मृत्यू,दारुड्या चालकाच्या हलगर्जीपणा व आरटीओ विभागाच्या दुर्लक्षितपणामुळे 2 मित्रांनी गमावला जीव

बुलडाणा – 25 फेब्रुवारी, मिरर न्युज नेटवर्क

शाळा सुटल्यावर विद्यार्थ्यांना अनधिकृतरित्य आपल्या वाहनात देऊळघाटकडे घेऊन जाणाऱ्या दारुड्या चालकाचा नियंत्रण सुटला आणि त्याने समोर चाललेली बुलेटला मागून जोरदार धडक दिली, या अपघातात जागेवरच एका तरुणाचा मृत्यू झाला होता तर 8 दिवसानंतर या अपघातात गंभीर जखमी दुसऱ्या तरुणाचा छत्रपती संभाजी नगर (औरंगाबाद) येथील एमजीएम रुग्णालयात रात्री उपचारादरम्यान दुर्दैवी मृत्यू झाला आहे. एकंदरीत या अनाधिकृत स्कूल व्हॅनच्या दारुड्या चालकाने दोन मित्रांचा जीव घेतल्याने देऊळघाट गावात शोककळा पसरली आहे.

याबाबत प्राप्त माहिती अशी की रियाज बेग जफर बेग रा.देऊळघाट 38 वर्ष आणि शे.तौसिफ शे.युसूफ रा.शेंदुर्णी जि.जळगाव 38 वर्ष हे दोघे लहानपणा पासून घट्ट मित्र होते.तौसिफ याचा शिक्षण देऊळघाट येथे मामाच्या घरी झालं.शिक्षण पूर्ण झाल्याने तो आपल्या गावी शेंदुर्णी येथे राहत होता.अधून मधून तो देऊळघाटला यायचं तेव्हा मित्र रियाज सोबत फिरायचं. 16 फेब्रुवारीला तौसिफ देऊळघाटला आलं आणि रियाज सोबत दुचाकीने डोळ्यांचं चष्मा आणायला बुलडाणा गेलं.काम आटपून सायंकाळी 6 च्या सुमारास दोन्ही मित्र बुलेटने घरी देऊळघाटकडे येत असतांना मागून भरधाव वेगात मारुती ईको व्हॅन आली व त्याने बुलडाणा ते देऊळघाट मार्गावर हॉटेल निवांत जवळ मागून बुलेटला जोरदार धडक दिली.दोन्ही वाहन शेतात पलटी झाले.व्हॅन मध्ये शालेय विद्यार्थी होते.अपघातात बुलेटवरील तौसिफ आणि रियाज यांच्यासह व्हॅन मधील 4 विद्यार्थी जखमी झाले होते.त्यांना तात्काळ बुलडाणा येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी शे.तौसिफ याला मृत घोषित केले तर रियाजला गंभीर दुखापत झाल्याने पुढील उपचारासाठी छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) येथील एमजीएम रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.उपचार सुरू असताना काल मध्यरात्री त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. ही माहिती देऊळघाट मध्ये पसरताच गावात एकच शोककळा पसरली आहे.

दारुड्या चालक आणि आरटीओ विभाग कारणीभूत

अपघात ग्रस्त व्हॅनचा चालक गोविंदा पसरटे हा नेहमी दारूच्या नशेत असतो आणि याच स्थितीत तो देऊळघाट येथील विद्यार्थ्यांची वाहतूक करतो. अपघाताच्या वेळी सुद्धा चालक नशेत होता. जिल्ह्यात अनेक वाहनात अनधिकृतपणे विद्यार्थ्यांची वाहतूक केली जाते. परंतु याकडे बुलडाणा आरटीओ विभागाचे स्पष्ट दुर्लक्ष असल्याची गंभीर बाब समोर आली आहे. देऊळघाट येथील 2 तरुणांचा मृत्यू म्हणजे याला इतर कोणी नव्हे तर दारुड्या चालक आणि आपल्या कर्तव्यात कसूर करणारा बुलडाणा आरटीओ विभाग असल्याची चर्चा गावकऱ्यांमध्ये सुरू आहे.

FM REDIO

spot_img

live Cricket Score

Latest

FM REDIO 2

मूर्तिजापूर जवळ अपघातात बुलडाणा येथील 2 तरुणांचा मृत्यू बुलडाणा - 7 फेब्रुवारी, मिरर न्युज नेटवर्क नागपूरहून लोखंडी पाईप घेऊन येणाऱ्या आयशर वाहनाचा रात्री अमरावती - अकोला राष्ट्रीय महामार्गावर मूर्तीजापुर तालुक्यातील कुरम...
spot_img
error: Content is protected !!