प्रजासत्ताक दिनी बुलडाणा जिल्हा पत्रकार संघ सन्मानित, जिल्हाधिकारी डॅा.किरण पाटील यांच्या हस्ते प्रशस्तीपत्र प्रदान

More articles

प्रजासत्ताक दिनी बुलडाणा जिल्हा पत्रकार संघ सन्मानित, जिल्हाधिकारी डॅा.किरण पाटील यांच्या हस्ते प्रशस्तीपत्र प्रदान

बुलडाणा, दि. 26 जानेवारी,मिरर न्युज नेटवर्क

समाजातील विविध घटकांसाठी आरोग्य, शैक्षणिक, सामाजिक व सांस्कृतिक उपक्रम राबवून उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल बुलडाणा जिल्हा पत्रकार संघाचा आज प्रजासत्ताक दिनी जिल्हाधिकारी डॅा. किरण पाटील यांच्या हस्ते प्रशस्तीपत्र देवून सन्मान करण्यात आला.
          पत्रकारांची मातृसंस्था असलेल्या मराठी पत्रकार परिषदेशी संलग्नित बुलडाणा जिल्हा पत्रकार संघाकडून वर्ष 2025-26 या कालावधीत पत्रकार आणि त्यांच्या कुटुंबीयांसह समाजातील विविध घटकांसाठी आरोग्य, शैक्षणिक, सामाजिक तसेच सांस्कृतिक क्षेत्रात कौतुकास्पद कार्यक्रम व उपक्रम राबविले. तसेच जिल्हा पोलीस प्रशासनाच्या मिशन परिवर्तन अंतर्गत बुलडाणा जिल्हा नशामुक्त व्हावा म्हणून नशामुक्तीवर आधारित विशेष कार्य केल्याबद्दल बुलडाणा जिल्हा पत्रकार संघाला प्रशस्तीपत्र देवून सन्मानित करण्यात आले.
यावेळी आमदार संजय गायकवाड, मुख्य कार्यकारी अधिकारी गुलाबराव खरात, पोलीस अधीक्षक निलेश तांबे, बुलढाणा जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष रणजितसिंह राजपूत यांच्यासह वरिष्ठ पत्रकार नितीन शिरसाट, चंद्रकांत बर्दे, राजेश डिडोळकर, युवराज वाघ, विलास खंडेराव, संतोष लोखंडे, सुनिल मोरे, अजय राजगुरे, मृणाल सावळे, रहमत अली आदी उपस्थित होते.

FM REDIO

spot_img

live Cricket Score

Latest

FM REDIO 2

बुलडाणा येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयच्या बांधकामावर परप्रांतीय मजुराने केलं मोठं कांड,5 वर्षीय अल्पवयीन मुलीसोबत नको ते कृत्यु व केले अपहरण, बुलडाणा ग्रामीण पोलिसांनी मलकापूर रेल्वे स्टेशन वरून मुलीला सुखरूप घेतले...
spot_img
error: Content is protected !!