2 अस्वल आले,,,एका गंभीर जखमीला केले अकोला रेफर तर दुसऱ्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू

More articles

2 अस्वल आले,,,एका गंभीर जखमीला केले अकोला रेफर तर दुसऱ्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू

बुलडाणा – 15 ऑक्टोबर, मिरर न्युज नेटवर्क

ज्ञानगंगा अभयारण्याला लागून असलेल्या करवंड शिवारात वेगवेगळ्या शेतात काम करणाऱ्या 2 जणावर अस्वलाने हल्ला केला आहे.यात एक जण गंभीर जखमी झाला असून त्याला पुढील उपचारासाठी अकोला रेफर करण्यात आले तर दुसऱ्यावर बुलडाणा येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहे.या घटनेने परिसरातील शेतकरी व नागरिकात भीतीचे वातावरण पसरलेले आहे. ही घटना आज 15 ऑक्टोंबर ला दुपारी 2 वाजेच्या सुमारास घडली आहे.
          याबाबत प्राप्त माहिती अशी की चिखली तालुक्यातील करवंड शिवारात रोहिदास हंजारी राठोड वय 42 वर्ष हे शेतात फवारणी करत असताना त्यांच्यावर अस्वलाने हल्ला चढविला आजूबाजूच्या शेतकऱ्यांनी आरडाओरड केल्याने अस्वल पडून गेला. मात्र पुढे दुसऱ्या शेतात काम करणाऱ्या दत्तात्रय दगडू लहाने वय 52 वर्ष रा. करवंड यांच्यावर देखील अस्वलाने हल्ला केला. यात ते देखील जखमी झाले आहे.दोन्ही जखमींना बुलडाणा येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यापैकी रोहिदास राठोड हे गंभीर जखमी असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी अकोला रेफर करण्यात आले आहे.घटनेची माहिती मिळताच बुलडाणा वन अधिकारी आणि कर्मचारी जिल्हा रुग्णालयात पोहोचले व त्यांनी जखमींची कैफियत जाणून घेतली. या हल्ल्यात जखमी झालेल्या दत्तात्रय लहाने यांनी “बुलडाणा मिरर”शी बोलताना सांगितले की शेतात ते सोयाबीनची गंजी लावत असतांना अचानकपणे 2 अस्वल आले आणि त्यापैकी एकाने त्यांच्यावर हल्ला चढविला होता.

FM REDIO

spot_img

live Cricket Score

Latest

FM REDIO 2

सलग 28 तास चालला अस्वलाचा थरारक रेस्क्यू,,, विहिरीत पडलेल्या अस्वलाला वन विभागाने दिले जीवदान,, मोताळा तालुक्यातील तारापूर येथील घटना बुलडाणा - 9 जानेवारी, मिरर न्युज नेटवर्क भौगोल वातावरण पौष्टिक असल्याने बुलडाणा...
spot_img
error: Content is protected !!